Ticker

6/recent/ticker-posts

ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन मंगरूळपीर


आज दिनांक 26 जुलै २०२३ रोजी सन्माननीय तहसीलदार राठोड साहेब यांच्यातर्फे महामहीम राष्ट्रपती व पंतप्रधान याना मणिपूर येथे आदिवासी महिलांची विवस्त्र करून दिंड काढणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक करून, कठोरात कठोर कारवाई  करण्यात यावी. अशी निवेदना मार्फत मागणी करण्यात आली.
मणिपूर हे मानसिक हिंसेने होरपडत आहे तेथील राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी जाणीवपूर्वक या हिंसेला खतपाणी घातले आहे.  याचा आम्ही ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन, व बिरसा मुंडा युवा संघ पारवा तर्फे जाहीर निषेध करतो . या हिंसाचाराच्या विषयावर विरोधी गटाला लोकसभेत बोलू दिल जात नाही, व आदिवासी समूहातील स्त्रियांवर लैंगिक अत्याचार करण्याचे घ्रिरणास्पद प्रकार घडत आहे . अलीकडे एका व्हिडिओ क्लिप द्वारे हे उघडनिस आले, आदिवासी स्त्रियांची नग्न दिंड आणि त्यांची शारीरिक विटंबना कुर पणे केली आहे. ही घटना अमनुष्य मानवाला कलंक आहे . या घटनेचा तसेच स्त्रिया वरील अशा सर्व प्रकारच्या अत्याचारांचा आम्ही तीव्र धिक्कार करतो. केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून मणिपूर मधील हिंसाचार ताबडतोब काबूत आणला पाहिजे. 
या हिंसाचाराचे भक्ष्यं झालेल्या पिढी त्यांना आवश्यक, ते अर्थसहाय्य आणि त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे . महिलांवर अन्याय अत्याचार होऊ नये व निवेदनासाठी  मंगरूळपीर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या महिलांचे शक्ती बळ व संघटन फार मोठे आहे. महिलांनी आपले घरातील काम आटपून निवेदन देण्यासाठी फार मोलाचा वेळ दिला त्याबद्दल त्याचे  धन्यवाद 
निवेदानासाठी तत्पर असणारे कार्यकर्ते व पदाधिकारी ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन फेडरेशन चे राज्य संघटक सन्माननीय श्री माजी गट शिक्षण विकास अधिकारी सुभाष रावजी पावणे साहेब व  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी मुख्याध्यापक सन्माननीय श्री जीवनराव हगवणे सर, सन्माननीय श्री कैलास ढगे सर, सन्माननीय श्री सुदाम भोडणे केंद्रप्रमुख, सुनील भाऊ सातपुते, गोपाल मैघने, गजानन शिंदे, योगेश ठोंबरे, प्रकाश टाले, गेडाम भाऊ आदींची उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments