Ticker

6/recent/ticker-posts

राठी विधी महाविद्यालयामध्ये पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न


प्रतिनिधी/
वाशिम : विद्यापीठाच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक ऍड. रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयामध्ये पदवी प्रमाणपत्राचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले.
दरवर्षी ज्या विद्यार्थ्यांनी पदवी पुर्ण केलेली आहे अश्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाव्दारे पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत होते. परंतु आता पदवी प्रमाणपत्र महाविद्यालयात वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार सन 2021 2022 च्या विधी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हया कार्यक्रमात पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. हया प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्राचार्य डॉ. सुशांत चिमणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन राजस्थान महाविद्यालयाचे इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ राजेश मस्के व मातोश्री शांताबाई गोटे वाशीम येथील लोकप्रशासन विभागाचे विभागप्रमुख व सं. गा. बा. अमरावती विद्यापिठाचे लोकप्रशासन व राजशास्त्रा अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. विलास गायकवाड हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. विलास गायकवाड यांनी कायदयाची पदवी घेणा-या विद्यार्थ्यांनी समाजातील उपेक्षीत वर्गांचा सुध्दा अभ्यास करुन त्यांना योग्य प्रकारे न्याय कसा मिळेल यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे तसेच नविन वकीलांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन गरिब वर्गाला सुध्दा किफायतशिर पणे खटले चालविण्यासाठी मदत करायला हवी असे मोलाचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ चिमणे हयांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, नविन विधी पदवीधर विद्यार्थ्यांनी नविन कायदयाचे निरंतर वाचन करुन स्वतःचे ज्ञान अद्यावत करायला हवे.केवळ पैसा कमविणे हेच अंतिम ध्येय न ठेवता न्यायासाठी सर्वतोपरी कसे झगडता येईल याचा विचार करायला हवा या विचारामुळे महाविद्यालयाचे नाव रोशन होईल असे सबोधले तसेच या प्रसंगी पदवीप्राप्त विद्यार्थी ओम भालेराव व सेवेंद्र सोनोने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला राजस्थान शिक्ष मंडळाचे अध्यक्ष ठाकुरदासजी मालाणी, सचिव सुधिरजी राठी, सदस्या तथा माजी अध्यक्षा श्रीमती शिलाताई राठी यांनी सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक डॉ सागर सोनी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थीनी पुजा राजेंद्र वानखेडे हीने केले. तर आभार प्रा संजय ईढोळे हयांनी व्यक्त केले. सदरील कार्यक्रमाला प्रा.भाग्यश्री धुमाळे व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठया प्रमाणाम विद्यार्थ्यांची उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments