बुलढाणा (दि.१५): संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे आणि महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या आदेशाने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे संभाजी ब्रिगेड मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे सर यांच्या हस्ते संभाजी ब्रिगेडच्या बुलढाणा (दक्षिण) जिल्हाध्यक्षपदी प्रा. योगेश्वर निकस सर यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, विभागीय उपाध्यक्ष रमेश ढगे, संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष, बुलढाणा पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष मुन्नाभाऊ भवानीवाले आदी पदाधिकारी व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
२०१६ मध्ये संभाजी ब्रिगेडने राजकारणात प्रवेश केला असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेडची युती आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करण्यात येणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जनतेचा आता कोणत्याही पक्षावर विश्वास राहला नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाच्या फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण करुन सत्तेत बसलेल्या राजकीय नेत्यांनी जनतेच्या समस्या व प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या विकासासाठी व जनतेच्या समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी संभाजी ब्रिगेड हा एकमेव उत्तम पर्याय असून संभाजी ब्रिगेडकडे महाराष्ट्रातील जनतेच्या आशा-अपेक्षा आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडकडे मोठ्या संख्येने तरुणांचा कल वाढत चालला आहे. आणि म्हणून राजकीय इच्छाशक्ती असणाऱ्या नवीन तरुण-तरुणींना संभाजी ब्रिगेडमध्ये संधी मिळणार असल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर यांनी केले आहे.
0 Comments