Ticker

6/recent/ticker-posts

युवासेनेने लावले जिल्हा परिषद शाळेला कुलूप.

युवा सेनेच्या आंदोलनामुळे नाना पाटेकर आठवले , सरकार मायबाप शिक्षक देता का शिक्षक . गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांच्या मुलांना शिकवण्यासाठी कोणी शिक्षक देता का हो शिक्षक


महाराष्ट्र शासनाने राज्यात नवीन उपक्रम सुरू केला शासन आपल्या दारी.मात्र देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत त्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे.शासनाने शासन आपल्या दारी आणल्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध करून द्यावे अशी मागणी युवासेनेने केली.
मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वर्ग ५ ते वर्ग १२ पर्यंत तब्बल २५ शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या.मात्र या आंदोलनाचा धसका घेऊन ४ शिक्षक प्रशासनाने उपलब्ध करून दिले. शिक्षकाच्या रिक्त असलेल्या जागेमुळे विद्यार्थ्याचे प्रचंड नुकसान होत आहे.मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात.
मंगरुळपिर येथील जिल्हा परिषद माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे विदर्भातील एकमेव असे जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे की जेथे १४०० च्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.मात्र शासनाच्या आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शिक्षक नसल्यामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्याचे नाव जिल्हा परिषद विद्यालयातून काढून दुसरिकडे टाकले.वर्ग पाच ते वर्ग बारा पर्यंत ४४ शिक्षकांची नियुक्ती असताना  केवळ आणि केवळ १९ शिक्षक आज उपलब्ध होते यापैकी ४ शिक्षक देण्यात आले. आहेत.विशेष म्हणजे नववी आणि दहावी या वर्गाला विज्ञान,गणित,इंग्लिश या विषयाला एकही शिक्षक नाही.
दहाविचे वर्ष विद्यार्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे वर्ष समजले जाते.असे असतानाही विद्यार्थ्याच्या भविष्याशी प्रशासन कोणता खेळ खेळत आहे ?

एकीकडे पटसंख्येेअभावी शासनाच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.शासनाच्या शाळा बंद पडू नयेत म्हणून शासन अनेक उपाययोजना राबवते.मात्र दुसरीकडे विद्यार्थी असूनही शिक्षक नसल्यामुळे शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत याकडे शासन,प्रशासन लक्ष देणार की नाही असा प्रश्न निर्माण होतो ?
मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये रिक्त असलेल्या सर्व शिक्षकांची नियुक्ती करावी किंव्हा प्रतिनियुक्तीवर इतर आस्थापनातील शिक्षक नेमून द्यावे जेणेकरून शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
असी मागणी युवासेनेने केली.
विधानसभा संपर्क प्रमुख विवेक नाकाडे, कॅप्टन प्रशांत सुर्वे, युवासेना जिल्हा प्रमुख जुबेर मोहनावाले, शिवसेना शहर प्रमुख सचिन परळीकर युवतीसेना जिल्हा प्रमुख प्रिया महाजन, युवासेना विधानसभा प्रमुख अर्जुन सुर्वे, जिल्हा सचिव गजानन ठेंगाडे, राजा भैया पवार अकील तेली,शुभम राठोड कॉलेज कक्ष, युवासेना शहर प्रमुख सुनील कुर्वे, विश्वास गोदमाले, सोनु जैस्वाल, रवी गोतरकर,संदीपान भगत सुमेर शेख, अजय भालेराव, सचिन राऊत, विठ्ठल महाले, प्रवीण घोडचर,आकाश कांबडे, सुनील भोंडणे, अजय सुरोसे, लखन गवळी, सचिन राऊत,मंगेश सावडे,सर्व युवासेना शिवसेना पदाधिकारी उपस्थिती होते.

Post a Comment

0 Comments