Ticker

6/recent/ticker-posts

म्हणून बळीराजा सुखावला...

    लेखक डॉ. गणेश शामराव कोरडे         त्वचारोग व सौंदर्य चिकित्सक, 
पत्रकार - प्रेमाजीत इंगळे (वाशीम )

     मागील काही दिवसांपासून सतत आजारी असलेल्या राजपुत्राची तब्ब्येत आत्ता आत्ता तर अधिकच खालावली होती, शेवटी त्यांना थेट अतिदक्षता विभागात हलवावे लागले, त्यात डॉ. वरुण राजे सुट्टीवर तशे ते कधी परतणार या विषयीची कल्पना श्री पंजाब डक यांनी बळीराजा ला दिली, पण काहीना काहीतरी उपचार करणे अपरिहार्य म्हणून जे जे डॉक्टर हजर होते त्यांच्या कडून उपचार करण्याचा निर्णय बळीराजा ने घेतला. डॉ. कुपनलिका मॅडम, डॉ. धरणराजे सर, डॉ. कालवे सर, डॉ. तळेगांवकर सर, डॉ. सरिता मॅडम, ई. नी जीवाचे रान केले आणि आपले कर्तव्य पार पाडले, या कार्यात त्यांना जेव्हा शक्य झाले तेव्हा विद्युल्लता मॅडम आणि भास्कर सरांनी मदत केली. तरीसुद्धा परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली होती. 
         अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी साक्षात डॉ. वरुण राजे अतिदक्षता विभागात हजर झाले. त्यांनी ताबडतोब उपचार पद्धती बदलली  काही जीवन रक्षक इंजेक्शन, सलाईन लावली तसतशी सर्वांच्या तब्ब्येतीत सुधारणा व्हायला लागली, नंतर सर्वांना जनरल वॉर्डात हलवण्यात आलं आणि पूर्णतः नॉर्मल झाल्यानंतर आत्ता सुट्टी देण्यात आली. आता सर्वजण ताजेतवाने झाले, खेळू बागडू लागले.  बळीराजाच्या घरी पुन्हा एकदा आनंदाचे उधाण आले. 

लेखक डॉ. गणेश शामराव कोरडे (त्वचारोग व सौंदर्य चिकित्सक, कोरडे स्किन क्लिनिक, वाशिम 9011943084)


Post a Comment

0 Comments