समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे दक्ष राहून सातत्याने कायदेशीर कारवाया केल्या जातात. त्यासाठी वेळोवेळी ऑपरेशन ऑल आऊट, कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी सारख्या विशेष मोहिमा राबवून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यामुळे कायद्याचा वचक निर्माण होऊन समाजात शांतता प्रस्थापित होते. याच पार्श्वभूमीवर मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (भा.पो.से.) यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली दि.२१.०९.२०२३ रोजी रात्री विशेष कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली.
त्यामध्ये संशयितरित्या फिरतांना आढळून आलेल्या ०३ इसमांवर कलम १२२ मपोका अंतर्गत तर जिल्ह्यातून तडीपार असतांनाही जिल्हा हद्दीत वास्तव्य करतांना आढळून आलेल्या ०२ इसमांवर कलम १४२ मपोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान एकूण २१ निगराणी बदमाश, १५ रेकॉर्डवरील माहितीगार गुन्हेगार, ०६ BW/NBW व स्टॅडिंग वारंटचे आरोपी तसेच १८ हॉटेल/धाब्यांची तपासणी केली.
कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान दारूबंदी अधिनियम अंतर्गत २० कारवाया तर जुगाराच्या ०५ कारवाया करण्यात आल्या असून जिल्हाभरात १३ ठिकाणी नाकाबंदी करून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ४२ लहान वाहने व १०६ मोठे वाहने असे एकूण १४८ वाहनांची तपासणी करण्यात आली. यापुढेही गुन्हे नियंत्रण व प्रतिबंधक कारवाईकरिता येणारे सण-उत्सव लक्षात घेता भविष्यातही अशा प्रकारच्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहिमा राबविल्या जाणार आहे.
सदर कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम व पथक तसेच सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्यासह जिल्हाभरातील २२ अधिकारी व १७७ अंमलदार व १०० पेक्षा जास्त होमगार्ड यांनी कामगिरी बजावली.
( जनसंपर्क अधिकारी )
पोलीस अधीक्षक कार्यालय,वाशिम.
0 Comments