मंगरूळपीर-स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय मंगरूळपीर तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी कला महाविद्यालय शेंदुर्जना घाट यांच्या MOU अंतर्गत गृह अर्थशास्त्र विभाग आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने *जागतिक अन्न दिनाचे औचित्य साधून भरडधान्य जनजागृती उपक्रम दिनांक 16/10/2023 सोमवार रोजी ऑनलाइन *अतिथी व्याख्यांन* चे आयोजन करण्यात आले.
मिलेट किंवा भरड धान्यापासून मिळणारे आरोग्य संबंधीचे फायदे खूप जास्त असल्याने त्याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे असे प्रा. लुंबिनी गणवीर यांनी प्रतिपादन केले व त्या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात आले.
तसेच प्रा. सुषमा जाजु यांनी असे प्रतिपादन केले की भविष्यात धान्याचा तुटवटा पडू नये म्हणून जगभरातच भरड धान्याचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न आणि प्रक्रिया करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रोफेसर डॉ. सुनिता बाळापुरे मॅडम , स्वर्गीय दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालय, नांदगाव पेठ हे होते यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आपल्या आरोग्या करिता भरड धान्या चे काय महत्त्व आहे हे सविस्तर मार्गदर्शन केले ,त्यातील पोषक घटकाविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. फुलारी सर यांनी या कार्यक्रमाला बहुमूल्य असं मार्गदर्शन केले, उपक्रमाचे भरभरून कौतुक केले तसेच प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांनीआपल्या अध्यक्षीय भाषणात असे प्रतिपादन केले की 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहे व या उपक्रमा मुळे भरड धान्या चे महत्त्व याबद्दल जनजागृती होऊ शकते असे प्रतिपादन केले व कार्यक्रमाचे कौतुक केले.
या अतिथी व्याख्यान मध्ये अनेक महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. एकूण 40 ते 50 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला . या कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा. लुंबिनी गणवीर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सुषमा जाजू यांनी मानलेत.उपक्रम यशस्वी संपन्न झाले.
समन्वयक
गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ
प्राध्यापक सौ. सुषमा जाजू
य .च .कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरूळपीर
0 Comments