पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावत असतांना प्रसंगी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देत हौतात्म्य पत्करलेल्या शहीद पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या स्मृतीपित्यर्थ दरवर्षी २१ ऑक्टोंबर हा दिवस ‘पोलीस स्मृती दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर नवीन पोलीस मुख्यालय, वाशिम येथील ‘शहीद पोलीस स्मृती स्तंभा’चे अनावरण मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या साक्षीने दि.२१.१०.२०२३ रोजी पार पडला.
पोलीस दलामध्ये ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य अंगीकारून समाजात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखून कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार अहोरात्र कर्तव्यरत असतात. वेळप्रसंगी कायद्याचे व समाजाच्या रक्षणासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार हे कर्तव्य सर्वतोपरी मानून आपल्या प्राणाची आहुती देतात. अश्याप्रकारे देशासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीदांच्या स्मृतीपित्यर्थ नवीन पोलीस मुख्यालय, वाशिम येथे ‘शहीद पोलीस स्मृती स्तंभा’ची स्थापना करण्यात आली असून सदर ‘शहीद पोलीस स्मृती स्तंभा’चा अनावरण सोहळा दि.२१.१०.२०२३ रोजी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या हस्ते पार पडला. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे उपस्थितीत मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी शहिदांना भावपूर्ण आदरांजली वाहली. यावेळी १८८ शहिदांच्या नावांचे वाचन करून शहिदांना मानवंदना देत सलामी देण्यात आली.
सदर कार्यक्रमाप्रसंगी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम श्री.सुनीलकुमार पुजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा श्री.जगदीश पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरूळपीर श्रीमती नीलिमा आरज यांचेसह सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व सर्व शाखा प्रमुख, पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, वाशिम व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मेहनत घेतली.
0 Comments