मंगरूळपीर-
स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ अंतर्गत अभ्यासक्रमावर आधारित विविध विषयांवर विद्यार्थिनींनी PPT द्वारे सेमिनार प्रेसेंटेशन दिनांक 12 ऑक्टोंबर ते 21 ऑक्टोबर 2023 या कालावधीत केले.
गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ समन्वयक प्राध्यापक सुषमा जाजु, अध्यक्ष डॉ. खान मॅडम हे उपस्थित होते. समन्वयक प्रा. सुषमा जाजू यांनी विद्यार्थिनींमध्ये असलेल्या अध्यापन कौशल्याला वाव देण्याकरिता तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास ,नवीन तंत्रज्ञानाचे महत्त्व ही जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महाविद्यालयांमध्ये राबविले जातात असे मत प्रतिपादन केले. तसेच अध्यक्ष डॉ. खान मॅडम यांनी सेमिनार प्रेझेंटेशन चे काही टिप्स विद्यार्थ्यांना सांगितले व त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरिता अशा प्रकारचे उपक्रम महाविद्यालयामध्ये राबविले जाते असे मत प्रतिपादन केले.
बी.ए. भाग 3 चे अंजली बोंबले ,प्रिया राऊत, ललिता निंबेकर, वैष्णवी राऊत ,राणी जामनिके ,सोनम शृंगारे ,साक्षी भगत ,वैष्णवी भगत, मोहिनी इंगळे, मोहिनी मनोहर, प्रज्ञा चुंबळे, प्रलया घोडे, निकिता खिराडे, प्रतीक्षा चौधरी या विद्यार्थिनींनी पीपीटी द्वारे सेमिनार प्रेझेंट केले.तसेच बी.ए .भाग 2 चे भूमिका आवारे ,विद्या नाकाडे ,अश्विनी फड , स्वाती वानखडे, प्रणाली भोयर,स्वाती इंगोले ,पल्लवी भगत, ,पायल गावंडे, संतोषी हवा, भावना खंडारे तसेच बी.ए .भाग 1चे गौरी ठाकूर शिवानी मोरे भक्ती सुर्वे आचल चव्हाण, चैताली पाकधने, कल्याणी पाकधने , लाजरी मिटकरी अश्विनी लहाने साक्षी भगत आरती गुप्ता अनामिका इंगोले इत्यादी विद्यार्थिनींनी सेमिनार प्रेझेंट केले.
या उपक्रमाला महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे सचिव चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन प्रा. सौ.सुषमा जाजु यांनी हे उपक्रम राबविले. यात जवळपास 35 विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला , तसेच बीए भाग 1,2 व 3 चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते व उपक्रम यशस्वी संपन्न झाले.
प्रा .सौ .सुषमा जाजू
समन्वयक
गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ
य. च. कला व विज्ञान महाविद्यालय मंगरूळपीर ,जिल्हा वाशिम
0 Comments