Ticker

6/recent/ticker-posts

गुटक्याच्या रेड सिग्नल ला मंगरूळपीर तालुक्यात ग्रीन सिग्नल

मंगरूळपीर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात दर दिवसाला लाखो रुपयांचा गुटखा शहरात तालुक्यात दुचाकी मार्फत किराणा दुकान , पान सेंटरवर पुरवला जात आहे राज्य शासनाने तंबाखूजन्य पदार्थावर बंदी घातली असली तरी सरकारच्या नियमाची पायमल्ली करताना गुटखा माफियाच्या माध्यमातून होत आहे .
 तालुक्यासह शहरात अनेक अल्पवयीन मुले शाळेतील विद्यार्थी गुडघ्याच्या मोठ्या प्रमाणात आहारी  गेले आहे. महाराष्ट्राला सर्वात मोठी कीड लागलेली ती म्हणजे कर्करोगाची महाराष्ट्रात सर्वाधिक ऋण जर दिवसाला कर्करोगाचे आढळून येतात कर्करोगावर नियंत्रण करण्यासाठी राज्य सरकारने तंबाखूजन्य पदार्थावर बंदी घातली असली तरी मंगरूळपीर शहरासह तालुक्यात राज्य शासनाच्या नियमावलीचे तीन तेरा वाजवले आहे. हा सर्व खेळ कुणाच्या भरोशावर असाही सवाल जनसामान्यात होत आहे. या गुटखा माफियांना स्थानिक प्रशासन आळा घालणार का ? नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब मंगरूळपीर तालुक्यासह शहरातील सुरू असलेल्या अवैध्य गुटखा माफियावर आळा घालणार का ? असा प्रश्न सुजान नागरिकांमध्ये चर्चेचा विषय होत आहे.

Post a Comment

0 Comments