Ticker

6/recent/ticker-posts

मुर्तिजापुर येथे पंचायतसमिती कार्यालयावर ग्रामपंचायत संगणक परीचालकांचे बेमुदत काम बंद आंदोलन…

• उपोषणाला अनेक मान्यवरांनी दिल्या भेटी.......

वुत्तसेंवा – अतुल नवघरे

लाखपुरी :-    , महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना  मुर्तिजापुर तालुक्याच्या वतीने आज दि. २० नोव्हेबर  २०२३ रोजी  ११ वाजता . पंचायत समिती कार्यालया समोर  धरणे आंदोलन करण्यात आले होते . या आंदोलनात मुर्तिजापुर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे संगणकपरिचालक उपस्थित होते. तालुका अध्यक्ष पंकज देशमुख ,जिल्हा उपाध्यक्ष  अतुल अबुलकर , रोशन ठोकळ, अतुल नवघरे,  अनिल इंगोले  ,नंदकिशोर सिरस्कार , स्वप्निल जोगी , सचिन धांडे,  सागर गाढवे  ,संदीप शिरसाट ,  उमेश गाडगे , महेश गुल्हाने, निलेश वानखडे ,मुमताज रहमान ,शुक्राचार्य तेलमोरे, उमेश कडू , उमेश  खेडकर, पंडित वासनिक , प्रफुलकुमार अवघाते ,सागर परकाळे , निलेश सरोदे ,निलेश मुगल, विजय लाटेकर , मिलिंद खंडारे ,राहुल गाडेकर , जगदीश पळसपगार ,सुरज काळे ,अमोल काळे ,चंद्रशेखर काळे , आरिफ खान , सागर परकाळे ,अक्षय गोलाम ,राजेश जूनेकर  , पंकज चौढाळे   सह इ. उपस्थिती होती. 

यांनी दिली उपोषणाला भेटी –
तालुकाप्रमुख शिवसेना (शिंदे गट )  दिपक दादळे , रविभाऊ राठी  (राष्ट्रवादी  प्रदेश संघटक सचिव ) भारत बोरखडे ( तालुका उपाध्यक्ष ग्रामसेंवक संघटना )   रवींद्र घुरडे ( पं.स. सदस्य )  सचिन  तायडे ( प.स. सभापती पती )  अप्पु तिडके ( तालुका प्रमुख शिवसेवा ठाकरे गट)  , देवाशिष भटकर ( उपसभापती ) वंजारे साहेब ( सामान्य प्रशासन अधिकारी  ) विजय किर्तेने ( विस्तार अधिकारी ) सचिन दिवानाले ( माजी महासचिव वंचित ) किशोर श्रीधर , संदीप गाडेकर , पंकज गुजर  , पंकज  सावळे ,  ऋषिकेश डिके , सुरज निघोट , बाळू   भोरकडे , धर्मराज ठाकूर , गजानन  गवळी ,अतुल  तेलगोटे सह अन्यकांनी दिल्या भेटी..

• ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालक  हे स्वतंत्र पद निर्माण करुन नियुक्ती मिळावी. तसेच किमान वेतन देण्यात यावं, या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी आजपासून राज्यभर संगणक परिचालकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरु आहे. मागील 12 वर्षापासुन ग्रामपंचायत  स्तरावर ग्रामविकास विभागानं नेमून दिलेले काम संगणक परिचालक प्रमाणिकपणे करत आहेत. ग्रामीण भागातील सुमारे सात कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे कार्य संगणक परिचालक अविरतपणे करत आहेत. 


• पुढील आंदोलनाची रूपरेषा :-
 १) दि.28/11/2023 ला सर्व जिल्हा परिषद समोर एकदिवशीय धरने आदोलन.
 २) दि.03/12/2023 पर्यंत आपल्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही तर दि.04/12/2023 ला सर्व आमदार साहेबाचे निवासस्थानासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन.
३) सर्व आदोलन निरर्थक ठरल्यानंतर दि.11 डिसेंबर 2023 ला हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा व मागण्यां पुर्ण होईस्तोवर धरणे आंदोलन. 

• मागण्या:-
१) यावलकर समितीच्या शिफारशीनुसार संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे . 
२) संगणक परिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळे पर्यंत २००००/- रुपये मासिक मानधन देणे 
३) टार्गेट पध्दत चुकीची असून ती तात्काळ रद्द करणे. 
४) सर्व संगणक परीचालकाचे एकुण थकित मानधन एकत्र  खातेवर जमा करने.

Post a Comment

0 Comments