वाशिम:विदर्भ प्रादेशीक माहेश्वरी , युवा , महिला संघटन, वाशिम जिल्हा माहेश्वरी संघटन, युवा संघटन, महिला संघटन वाशीम, तालुका माहेश्वरी संघटन, युवा संघटन, महिला संघटन वाशीम संघटनेच्या वतीने रविवार १७ डिसेंबर रोजी स्थानिक महेश भवन येथे दुपारी ३ वाजता एकमेकांपासून दुपार होणारे भांवडे, दाम्पत्य, तुटणारे नाते, परिवार, व युवा पिढीवर कमी होत चालले संस्कार या विषयावर प्रमुख वक्त्या चेतना लहरच्या प्रदेश संयोजिका किरण मुंदडा यांचे सामाजिक समस्यांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महासभाचे माजी सभापती श्यामसुंदर सोनी, युवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद सोनी आदिं समवेत मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
१७ डिसेंबर रोजी विदर्भ प्रादेशीक माहेश्वरी संघटनेची व्दितीय सभा पार पडणार असून त्याचे आतिथ्य वाशीम जिल्हा माहेश्वरी संघटनेला मिळाले आहे. सकाळी ९ वाजता नोंदणी, १० वाजता प्रथमसत्र सभा, १२ वाजता व्दितीय सत्र सभा, दुपारी २ ते ३ तृतियसत्र सभा, दुपारी ३.३० ते ५ चेतना लहर अंतर्गत सामाजिक समस्यांवर चर्चासत्र होणार आहे. कार्यक्रमाला युवा संघटनचे प्रदेशअध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष यांचेही मार्गदर्शन प्रदेश महिला संघटनेचा अहवाल ठेवण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला जिल्हयातील सर्व पदाधिकारी तथा चर्चासत्र कार्यक्रमाला दुपारी महिला व समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष कैलास मुंदडा, सचिव सुनिल गट्टाणी, प्रदेश संयुक्त मंत्री शिवलाल भुतडा, युवा संघटन जिल्हाध्यक्ष डॉ. रोशन बंग, तालुकाध्यक्ष आशिष हुरकट, युवा संघटन तालुकाध्यक्ष ललित राठी व पदाधिकारी यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महासभाचे राष्ट्रीय संयोजक अनिल राठी करणार आहेत.
0 Comments