Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक गुन्हे शाखेने केला जबरी चोरीचा गुन्हा उघड आरोपीकडुन ६३०७८० लाखाचा मुददेमाल हस्तगत


नागरीकांच्या मालमतेचे रक्षण करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव सतर्क असून मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे (भापोसे) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबरी चोरी कर-याना अटक करुन त्यांचे कडुन ६,३०,७८०रु चा माल हस्तगत केला आहे.

पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे दि.१३.१२.२०२३ रोजी फिर्यादि नामे चैनसिंग मंगुसिंग तवर वय ४० वर्ष रा. भालतपुरा ता. भिकनगांव जिल्हा खरगोट मध्यप्रदेश यांनी दिलेल्या तकारीवरून पो.स्टे. वाशिम ग्रामीण येथे अप.क. ५३१/२०२३ कलम ३९४ भादवि अन्वये : अज्ञात आरापीविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपासात स्थानिक गुन्हे शाखा वाशिम याना गुप्त बातमीदारा कडुन माहीतीचे आधारे आज दि.१६.१२.२३ रोजी आरोपी नामे रामदास अशोक धोगंडे वय २३ वर्ष रा. जांभरुन परांडे व आरोपी नामे राहुल गजानन करवते वय २५ वर्ष रा. सिव्हील लाईन वाशीम यांनी ताब्यात घेवुन त्यांना गुन्हा संबंधी विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हयांची कबुली दिली व गुन्हयात जबरीने चोरी केलेला माल गहु २७ कटटे किंमत ३०,७८० रु व गुन्हयात वापरलेला ट्रॅक्टर किंमत ५,००,००० रु व एक मोटार सायकल प्लसर १,००,०००रु असा एकुण ६,३०,७८० रु चा माल हस्तगत करण्यात आला असुन यातील इतर ०२ आरोपी फरार आहेत. सदर गुन्हयाचा तपास पोलीस स्टेशन वाशीम ग्रामीण हे करीत असल्याने नमुद आरोपी व जप्त मुददेमाल पोलीस स्टेशन वाशीम ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आला आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षकः अनुज तारे (भापोसे) यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम सुनिल पुजारी पोनि रामकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक सपोनि जगदिश बांगर, पोहवा गजानन अवगळे, गजानन झगरे, संतोष कंकाळ, प्रविण शिरसाट, पोलीस नाईक ज्ञानदेव मात्रे, गजानन गोटे, पोलिस शिपाई दिपक : घुगे, शुभम चौधरी, चालक पोलिस नाईक स्वप्निल तुळजापुरे नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी जर पाडली.

Post a Comment

0 Comments