महाराष्ट्र लोकविकास मंच या स्वयंसेवी संस्थांच्या संघटनेमार्फत मा. " कालींदी ठुबे पाटील " याना 10 डिसेंबर 2023 रोजी धाराशिव येथे " समाजगौरव पुरस्कार " देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे पत्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ तोडकर सचिव भूमिपुत्र यांनी दिले.
कालींदी ठुबे पाटील यानी सत्ताविस वर्षा पूर्वी पासून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करतात त्यादरम्यान मराठवाड्यात झालेला भूकंप त्या भूकंपात दहा हजार माणसाचा बळी घेतला. घरे दारे उध्वस्त झाली. सर्वांचे संसार कोलमडून पडले.ते सावरण्यासाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी या रणरागिनी म्हणून कार्यात उतरलया. यामध्ये गावाचे पुनर्वसन करणे, महिलांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी कार्याला सुरुवात केली. किशोरी मुलींना मार्गदर्शन आणि सक्षमीकरण करणे.युवांना विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून पायावर उभा करणे. जलसंवर्धन, पर्यावरण संवर्धन यासाठी वृक्ष लागवड करून समाजाला वेगळा आदर्श घालून दिले, त्यासोबत महिलांसाठी समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून अत्याचारित महिलांना न्याय देण्यासाठी अहोरात्र कार्य करत असतात.
महाराष्ट्र महिला विकास मंचच्या माध्यमातून महीलांचे संघटनात्मक व्यासपीठ महाराष्ट्रात उभे आहे . विधवा महिलाचे पति निधनानंतर,अंतिम विधीवेळी तीच्या बांगडया बोलणे,कुंकु पुसणे, मंगळसुत्र तोडणे अशा जीवघेण्या प्रथा बंद करण्यासाठी महाराष्ट्र महिला विकास मंच च्या वतीने प्रयत्न चालू आहेत . 5 जिल्ह्यातून 4600 महीलाना बचत गट सक्षमीकरण, कौशल्यवृद्धी, उपजीविका स्त्रोत , लघुउद्योग, असे विविध प्रशिक्षण देऊन त्यांचे जीवन प्रकाशमय बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
17 जिल्ह्यातुन 8700 महीला व शाळा काॅलेज मधुन 3000 हजार मुलीना आर्थिक साक्षरताचे प्रशिक्षण देण्यात आले आहे यात शासकीय विमे,पोस्टाचा विमा ,,आरोग्य विमा,ईत्यादी माहिती 35 महीला प्रशिक्षक देत आहेत.
कालींदी ठुबे पाटील या सध्या ता. खेड जि.पुणे येथे केंद्र शासनाच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या "जल जीवन मिशन " या शासकीय प्रकल्पात " वरिष्ठ समाजशास्त्रज्ञ " म्हणून काम पाहतात
महाराष्ट्रातून आजपर्यंत केलेल्या कार्याचा गौरव व्हावा, सन्मान व्हावा, म्हणून महाराष्ट्र लोक विकास मंचचा " समाज कार्य " गौरव पुरस्कार कान्हुर पठार ता.पारनेर च्या महाराष्ट्र महिला विकास मंचर संस्थापक अध्यक्ष कालींदीताई ठुबे पाटील यांना आज दिला जाणारा मानाचा पुरस्कार 10 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा धाराशिव येथे सन्मानित केले जाणार आहे. ताईंचे मनापासून हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र महिला विकास मंचच्या उपाध्यक्षा विनीता दिवेकर ,महासचिव रेवती आढाव, सचिव उज्वला साळवे,
राज्य विभागीय प्रसिद्ध प्रमुख
सुधाकर चौधरी, विभागीय अध्यक्षा
(पश्चिम महाराष्ट्र) मिनल कुडाळकर
व 36 जिल्ह्यातून संघटनेच्या वतीने ताईंवर शुभेच्छांच्या वर्षा होत आहे. अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Comments