Ticker

6/recent/ticker-posts

"देव माणसाच्या मनात राहतो, देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट भरते !.. गजानन हरणे समाजसेवक यांचे प्रतिपादन.

 
अकोला.............................. संत गाडगे महाराज प्रतिष्ठान देऊळगाव च्या वतीने कर्मयोगी विज्ञानवादी खरे संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .या पुण्यतिथीला प्रमुख वक्ते म्हणून समाजसेवक तथा  निर्भय बनो जन आंदोलनाचे संयोजक गजानन हरणे यांनी आपला मार्गदर्शनातून गाडगे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यामध्ये ते बोलताना म्हणाले की  आपल्या कीर्तनातून विज्ञानवादी कडवट पण खरा संदेश देणारे संत गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी आजच्या घडीला देशाची परिस्थिती काही वेगळी नाही. आज पैसा नाही म्हणून सरकारी शाळा बंद करणारे सरकार कोट्यावधी रुपयांची धार्मिक स्थळे बांधण्यात व्यस्त आहे.गावागावांमध्ये कोट्यावधी रुपयांची धार्मिकस्थळे बांधली जातात परंतु त्याच गावात शिक्षण, आरोग्य यांचा प्रश्न सुटत नाही.यामुळे आजच्या स्थितीला गाडगे महाराजांचे विचार आपल्या सर्वांच्या मनात रुजणे किती आवश्यक आहे. गाडगे महाराजानी मंदिर नव्हे तर  लोक उपयोगी धर्मशाळा आदी उपक्रम राबवले हे दिसून येत आहे. देव माणसाच्या मनात राहतो, देवळात फक्त पुजाऱ्याचे  पोट भरत असल्याचे प्रतिपादक समाजसेवक गजानन हरणे यांनी गाडगे महाराज  यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करताना मार्गदर्शनात केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.निखिल साबळे ,प्रमुख वक्ते म्हणून गजानन हरणे समाजसेवक हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक कु विद्या नळकांडे तर आभार विजय पडगिलवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता कर्मयोगी गाडगे महाराज प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.                             

Post a Comment

0 Comments