Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात पुढे काय होईल? भाजप-RSS बैठकीबद्दल जितेंद्र आव्हाडांचा 'एक्स'वर मोठा गौप्यस्फोट

हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले असून यानंतर आता राज्यातील निवडणूकांच्या तयारीला जोर येणार आहे. दरम्यान नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी अशी चर्चा सुरू झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा दावा केला आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपने तीन राज्यात मोठा विजय मिळवला आहे. यानंतर भाजप हायकमांडने या तीनही राज्यात मुख्यमंत्री पदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये भाजपने बड्या चेहऱ्यांना डावललं. या पार्श्वभूमिवर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले." असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

"या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले." असा दावा देखील आव्हाडांनी केला आहे.

इतकेच नाही तर आव्हाडांनी पुढे लिहीलं की, ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही."

Post a Comment

0 Comments