सायबर गुन्ह्यांपासून मुलांचे रक्षण
विद्यार्थ्यांना शिक्षकांनी कमी गृहपाठ द्यावा असंही राज्यपाल बैस यांनी सुचवलं. "शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व्हावे यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांना कमी गृहपाठ कमी देण्याकडे शिक्षकांचा कल हवा. त्याचप्रमाणे खेळ व इतर कृतिशील उपक्रमांवरही शिक्षकांनी भर द्यायला हवा,’ अशा सूचनाही बैस यांनी केल्या. आधुनिक आव्हानांसंदर्भात भाष्य करताना बैस यांनी, ‘सायबर गुन्ह्यांपासून मुलांचे रक्षण करण्यासाठी शाळांमध्ये व्याख्याने व सत्रांचे आयोजन केले जावे,’ असं म्हटलं आहे.
ग्रथांलयांमधील पुस्तके जुनी, कालबाह्य
"राज्यात शेकडो सार्वजनिक ग्रंथालये असूनही त्यापैकी अनेक ग्रंथालये आज ओस पडल्याचं दिसत आहे. बहुतांश ग्रथांलयांमधील पुस्तके जुनी अथवा कालबाह्य झाली आहेत. राज्यातील सर्वच वाचनालयांना इंटरनेट, कंम्प्युटरसारख्या सुविधा देऊन नवसंजीवनी देण्याची गरज आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून ग्रंथालय दत्तक योजना सुरू करायला हवी," असेही राज्यपालांनी नमूद केले.
अनेक उपक्रमांचा प्रारंभ
राजभवनामधील याच कार्यक्रमामध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाबरोबरच शालेय विद्यार्थ्यांसंदर्भातील ‘स्वच्छता मॉनिटर-2’, ‘दत्तक शाळा उपक्रम’, ‘गोष्टींचा शनिवार’, ‘माझी शाळा, माझी परसबाग’, ‘आनंददायी वाचन’ या उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या नवीन शालेय इमारतींचे लोकार्पण करण्यात आलं. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सुरज मांढरे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
0 Comments