रिसोड तालुक्यातील विविध व्यक्तिकडून सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या अवैध सावकारी व्यवहारासंबंधीच्या तक्रारीच्या चौकशीकरीता महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ चे कलम १६ अंतर्गत अवैध सावकारी करणारे ४ व्यक्तिच्या ठिकाणावर सहकार विभाग आणि पोलीस विभागाकडील संयुक्त पथकांद्वारे आज दि.६ डिसेंबर रोजी झडती कारवाई करण्यात आली. यामध्ये वंदना सत्यनारायण अग्रवाल (मुळ गैरअर्जदार स्व. सत्यनारायण हजारोमल अग्रवाल यांच्या पत्नी) रा. केशवनगर ता. रिसोड जि.वाशिम, प्रदीप माणिकराव तिफणे, रा. लेहणी ता. रिसोड जि.वाशिम, परसराम बंडूजी सोनुने, रा. गोवर्धन ता. रिसोड जि.वाशिम, नारायण रामकृष्ण भावसार, रा, मथुरा नगर, रिसोड ता. रिसोड जि.वाशिम याठिकाणी करण्यात आलेल्या झडती कारवाईदरम्यान काही ठिकाणी कथित अवैध सावकारी व्यवहारासंबंधाने पुढील चौकशी करीता आवश्यक असलेली कागदपत्रे उदा. स्थावर मालमत्तेची खरेदीखते ताब्यात घेण्यात आली आहेत. तसेच एका प्रकरणात कोरे बाँड, धनादेश इ. कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. याअनुषंगाने सावकारी कायद्या अंतर्गत पुढील चौकशी सुरु करण्यांत येणार आहे. सदरची कारवाई ही बुबनेश्वरी एस. जिल्हाधिकारी वाशिम, अनुज तारे, पोलीस
अधिक्षक, वाशिम, व्ही. डॉ. कहाळेकर
विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांचे मार्गदर्शन आणि नियंत्रणाखाली पार पाडण्यात आली. तसेच नानासाहेब चव्हाण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांचे विशेष मार्गदर्शन सदर कारवाईकरीता लाभले आहे. सदर कारवाईमध्ये आर. आर. सावंत, सहाय्यक निबंधक (प्रशासन) वाशिम, एम. डी. कच्छवे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था वाशिम, एम.बी.बनसोडे सहकार अधिकारी (श्रेणी-१) मंगरूळपीर, पि.एन. झळके, सहकार अधिकारी (श्रेणी-१) वाशिम यांनी पथक प्रमुख म्हणून कामगिरी केली, तसेच एन. के. मेहकरकर सहकार अधिकारी (श्रेणी-१), कारंजा, पि.आर. वाडेकर, सहकार अधिकारी (श्रेणी-२), वाशिम, डी. यु. खुरसडे मुख्य लिपीक, वाशिम, के. जी. चव्हाण सहकार अधिकारी (श्रेणी-२) मालेगाव, कु.एम. के. जाधव सहकार अधिकारी (श्रेणी-२), मंगरूळपीर, एस.पी. सांगळे सहाय्यक सहकार अधिकारी, मानोरा, कु.बी.ए. इंगळे सहाय्यक सहकार अधिकारी वाशिम, एस.पी. रोडगे मुख्य लिपीक रिसोड, केशरी राठोड, कनिष्ठ लिपीक मंगरूळपीर यांनी सहाय्यक म्हणून कामकाज केले. सदर कारवाई करीता बी. बी. मोरे प्रभारी सहाय्यक निबंधक सह. संस्था रिसोड, आणि एस.जी. गादेकर सहाय्यक सहकार अधिकारी वाशिम यांना आवश्यक ते नियोजन व व्यवस्था केलेली.
0 Comments