Ticker

6/recent/ticker-posts

श्री धानोरकर आदर्श विद्यालयांमध्ये अंतरिक्ष महायात्रा प्रदर्शन

 स्थानिक श्री धानोरकर आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा खुर्द, येथे दिनांक 4 डिसेंबर रोजी अंतरिक्ष महायात्रा प्रदर्शनीचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले. याप्रसंगी उपस्थित असलेल्या संस्थेच्या कोषाध्यक्ष श्रीमती रजनीताई धानोरकर मॅडम हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या .तर इसरो बसच्या उद्घाटनाला माजी गटशिक्षणाधिकारी सौ सविता आतकरे मॅडम, श्रीमती आशाताई खोटरेमॅडम ,सुभान अख्तर खान मॅडम ,यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या .तर विद्यालयाचे प्राचार्य श्री मा मंगेश भाऊ धानोरकर सर यांनीही प्रमुख अतिथीचे स्थान स्वीकारले. इस्रो बसचे रीतसर उद्घाटन करून आजूबाजूच्या परिसरातील सर्व शाळा व महाविद्यालय तसेच श्री धानोरकर आदर्श विद्यालयातील विद्यार्थी यांना प्रदर्शनी बघण्याकरिता खुली करून देण्यात आली. 
याप्रसंगी प्रमुख अतिथींनी विज्ञान व गणित याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड कशी निर्माण होईल यांचे मोलाचे मार्गदर्शन केले. सोबतच दोन डिसेंबर रोजी चंद्रयान तीन च्या यशस्वीतेमुळे इस्रो बसच्या सोबतच रांगोळी स्पर्धा ,भित्तिपत्रक स्पर्धा, व प्रश्नमंजुष्याचे आयोजन करण्यात आले होते .प्रमुख अतिथींनी या सर्वांची पाहणी करून परिसरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. आपल्या मार्गदर्शनात त्या सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, श्रीनिवास रामानुजन यांनी केलेल्या कार्याचे आणि विद्यार्थ्यांमधून भारत देशाचे नाव उंचवण्यासाठी अपेक्षा व्यक्त करून अध्यक्षांनी मार्गदर्शन केले .इस्रो बसच्या सर्व अंतरिक्ष मोहीम विद्यार्थ्यांना पाहता यावी म्हणून आणि सर्वांना अंतरिक्ष महायात्रा समजावी म्हणून या बसचे आयोजन थोर शास्त्रज्ञ श्री मा. शरदजी काळे यांनी केलेले आहे. परिसरातील सर्व शाळांनी व श्री धानोरकर आदर्श विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीमध्ये मोठा सहभाग नोंदविला आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बद्दल खूप मोठ्या प्रमाणात माहिती मिळविली .
प्रदर्शनी उद्घाटन कार्यक्रमाची संचलन विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री गोपाल पाटील सर यांनी केले .व समारोपीय कार्यक्रम श्री अजय ढेंगळे सर व श्री गोपाल पाटील सर यांनी पार पाडला .यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते व मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments