Ticker

6/recent/ticker-posts

अभ्यासा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष आत्माराम चव्हाण यांना राज्यस्तरीय बेस्ट स्कूल पुरस्कार :-

 
 मंगरूळपीर:-  मुंबई भायखळा येथे अण्णाभाऊ साठे नाट्य सभागृहात दिनांक 18 व 19 जानेवारी रोजी झालेल्या महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन चे राज्यस्तरीय 9 वे अधिवेशनामध्ये मंगरूळपीर येथील अभ्यासा इंग्लिश स्कूल ,हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज चे अध्यक्ष आत्माराम चव्हाण यांना बेस्ट स्कूल अवार्डने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आला . यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे ,आमदार सचिन अहिर, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर संजय तायडे पाटील, प्रदेशाध्यक्ष डॉक्टर नामदेव दळवी, महिला प्रदेशाध्यक्ष सौ सुदर्शन ताई व इतर राज्यस्तरीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट शाळा 2023 -24 ने सन्मानित करण्यात आला यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या भाषणामध्ये सर्व संस्था चालकांना शिक्षणा विषयक मार्गदर्शन केले .तसेच मेष्टाचे अध्यक्ष डॉ संजय तायडे पाटील अभ्यासा इंग्लिश स्कूल, हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज बद्दल बोलताना अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात वेगळा ठसा निर्माण करणारे आत्माराम चव्हाण सर यांनी आपल्या शाळेत देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या  च्या मुलांना तसेच आत्महत्याग्रस्त पालकांच्या विद्यार्थ्यांना व कोरोना मध्ये छत्र हरविलेल्या  पाल्यांना मोफत शिक्षण देऊन एक आदर्श निर्माण केले  आहे असे सांगितले .या कार्यक्रमाला राज्यभरातून सर्व संस्था चालक उपस्थित होते अभ्यासा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष आत्माराम चव्हाण यांना बेस्ट स्कूल अवार्ड ने सन्मानित केल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments