Ticker

6/recent/ticker-posts

स्वराज्य पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी संजय पवार यांची नियुक्ती : संभाजीराजे यांची लोकसभा निवडणुकीसाठीच्या हालचाली सुरू



छत्रपती संभाजीराजे यांचे निकटवर्तीय संजय पवार यांची  स्वराज्य पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी ही नियुक्ती केली असून कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची ठरणार आहे. 

कोल्हापूर लोकसभेकरिता छत्रपती संभाजीराजे यांचे नाव चर्चेत असून नुकताच जिल्ह्यातील संभाजीराजे गटाचा भव्य मेळावा कोल्हापूरात पार पडला. या मेळाव्यात संभाजीराजे यांनी लोकसभेच्या आखाड्यात उतरावे, यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला होता. या संपूर्ण मेळाव्याचे नियोजन देखील संजय पवार यांनीच केले होते.
या पार्श्वभूमीवर संजय पवार यांची स्वराज्य पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदी केलेली नियुक्ती ही संभाजीराजे यांच्या लोकसभा तयारीची नांदीच आहे, असे स्पष्ट दिसत आहे.

यावेळी फत्तेसिंह सावंत, प्रसिद्धी प्रमुख राहुल शिंदे, विष्णू जोशिलकर,प्रविण पवार, सचिव अमर पाटील, दिपक सपाटे, धनाजी खोत, अजयसिह पाटील, सोमनाथ लांबोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments