Ticker

6/recent/ticker-posts

लिनेस क्लब वाशिमचा पदग्रहण समारंभ उत्साहातअध्यक्षपदी अनिता नेनवाणी, सचिवपदी मिना कंदोई तर कोषाध्यक्षपदी मिना बंग यांची निवडगरजु महिलांना ब्लँकेट, स्वेटर वाटप आणि गोमातेसाठी चारा व गुळाची व्यवस्था


वाशिम - लिनेस क्लबचा वर्ष २०२४ चा पदग्रहण समारंभ बुधवार, १७ जानेवारी रोजी स्थानिक पाटणी कर्मशियल कॉम्प्लेक्समधील चिंतामणी कॉन्फरन्स हॉलमध्ये उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला अकोल्याहून लिनस क्लबच्या प्रांताध्यक्षा स्वाती झुनझुनवाला, प्रांत सचिव रत्नमाला रुईकर, प्रांत कोषाध्यक्ष दिव्या देशमुख यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात अनुपमा मानधने यांच्या स्वागतगीताने करण्यात आली. सर्व पदाधिकार्‍यांचे स्वागत करण्यात आले. २०२४ च्या कार्यकारणीमध्ये लिनेस क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा म्हणून अनिता नेनवाणी, सचिव मिना कंदोई तर कोषाध्यक्ष म्हणून मिना बंग यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आणि पदाची शपथ घेण्यात आली. सारिका बाकलीवाल आणि प्रीती काकाणी यांनी अकोल्याहून आलेल्या पाहुण्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. नवनिर्वाचित अध्यक्षा अनिता नेनवाणी यांनी आपल्या भाषणातुन २०२४ मध्ये होणार्‍या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. सेवेत शांतता असते. या दुव्याचा अवलंब करून आम्ही आमच्या कार्यकाळात सेवा कार्य उत्तम प्रकारे करू आणि शहराच्या कानाकोपर्‍यात जाऊन हे काम सर्व गरजूंपर्यंत पोहोचवू असे उद्गार त्यांनी काढले. उद्घाटनानंतर अध्यक्षांच्या उपस्थितीत गरजू महिलांना ब्लँकेट, स्वेटर वाटप करण्यात आले. तर गायीसाठी चारा व गुळाची व्यवस्था करण्यात आली. चांगल्या कामाची सुरुवात आपण आपल्या घरापासून करावे या उदाहरणानुसार सर्व लिनेस पदाधिकारी महिलांनी आपल्या घरी काम करणार्‍या सर्व महिलांना ब्लँकेटचे वाटप केले. सर्व लिनेस भगिनींना हळदी कुंकू देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन हिना नेनवानी व पूनम चंदनानी यांनी केले तर आभार मीना कंदोई यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी २०२३ च्या अध्यक्षा अर्चना डाळे, सचिव पूनम लढ्ढा व कोषाध्यक्ष सरिता अग्रवाल यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमामध्ये शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या व विविध सामाजीक पदांवर कार्यरत असलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व लायनेस सदस्यांनी संपूर्ण सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments