मंगरूळपीर-श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा द्वारा संचालित यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय ,मंगरूळपीर या ठिकाणी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे कोषाध्यक्ष श्री दिलीपराव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व डॉ. पवार सर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला . या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.त्यानंतर स्वयंसेवक क्षत्रिय समन्वयक डॉ. इंगळे, कार्यक्रमाधिकारी डॉ. उल्हे,महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. सुषमा जाजु, सरपंच शितलताई गावंडे, उपसरपंच उमेश भाऊ गावंडे यांनी दत्तग्राम वरुड येथे भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.या रॅलीमध्ये ग्रामपंचायत सर्व सदस्य व गावातील मंडळी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शिवगर्जनेने झाली शिवाजी महाराजांची पालखी सजवून मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे पालखीच्या मागे बाल शिवाजी बनून घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली होती त्याच्यामागे स्वयंसेविकांचे लेझीम पथक त्याच्यामागे गावातील बाल मंडळी नंतर महिला व पुरुष मंडळी असा हा पालखी सोहळ्याचा कार्यक्रम अगदी आनंदी वातावरणात आणि उत्साहात सुरू झाला. गावात प्रत्येकाने दारी रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले.चोका चौकात लेझीम सादरीकरण झाले फुगडी खेळून गावकऱ्यांनी व सर्व स्वयंसेवकांनी आपला उत्साह दाखविला.गौरी मिसाळ हिने लाटी काटी चे सादरीकरण केले. नंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकांनी शिवाजी महाराजांच्या जन्मावर आधारित व कार्यांवर आधारित सुंदर नृत्याचे सादरीकरण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरती सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला त्यानंतर गावचे उपसरपंच श्री उमेश भाऊ गावंडे यांनी मनोगत व्यक्त केले क्षत्रिय समन्वयक डॉ.संजीव इंगळे सर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की शिवाजी महाराजांची आचार विचार आत्मसात करून खरी शिवजयंती साजरी होईल त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण सुद्धा कार्य करावं अशाप्रकारे मार्गदर्शन केले त्यानंतर कार्यक्रम अधिकारी डॉ.चंद्रकांत उल्हे सरांनी गावातील मंडळीने कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार व्यक्त केले त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने खिचडीचा महाप्रसाद वितरण झाला व कार्यक्रम ठीक 1 वाजता समाप्त झाला.
0 Comments