मंगरूळपीर-मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ ,कासोळा द्वारा संचालित यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळ अंतर्गत दत्तक ग्राम वरुड येथील नवयुवती व महिलांकरिता दोन दिवशीय *हस्त कौशल्य व पाककृती* कार्यशाळेचे आयोजन दिनांक-21 व 22 फेब्रुवारी 2024 रोजी येथील ग्रामपंचायत हॉल येथे करण्यात आले.
हस्तकौशल्य कार्यशाळे चे अध्यक्ष कु. सुमित्राताई वानखडे (ग्रामसेवक), प्रमुख अतिथी सौ. शितलताई गावंडे (सरपंच)तसेच प्रमुख मार्गदर्शक समन्वयक प्राध्यापक सौ. एस. एस.जाजू हे होते.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा चे मान्यवरांचे हस्ते पूजन करण्यात आले व तसेच पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्राध्यापक सौ.जाजू यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक व उद्देश स्पष्ट केले तसेच प्रमुख अतिथी शितलताई गावंडे यांनी आपले मनोगत केले आणि अध्यक्ष भाषणात सुमित्राताई वानखेडे यांनी कार्यशाळेचे कौतुक केले.
हस्तकौशल्य कार्यशाळेमध्ये बी.ए. भाग 1 चे 15 विद्यार्थ्यांचे सहभा ग लाभले, त्यात विविध वस्तू प्रात्यक्षिकेद्वारे करून दाखवले त्यात कल्याणी पाकधने, चैताली पाकधने व आचल चव्हाण यांनी झुंबर , शिवानी मोरे ,भक्ती सुर्वे यांनी लोकरीचा मोर, साक्षी भगत, अश्विनी लहाने यांनी पेन स्टॅन्ड, निकिता भगत ,अनामिका इंगोले यांनी लोकरीचे तोरण , आरती गुप्ता ,गौरी ठाकूर यांनी लोकरीचा पर्स, लाजरी मिटकरी ,प्रज्ञा भगत यांनी पेन स्टँड, पलक इंगोले, राधा खांडरे यांनी लोकरीचे तोरण हे सर्व प्रात्यक्षिकेद्वारे करून दाखवले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन चैताली पाकधने आणि आचल चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन कल्याणी पाकधने यांनी मानले. कार्यशाळेत 40 लाभार्थी यांनी लाभ घेतला.
तसेच दिनांक 22 फेब्रुवारी 2024 ला पाककृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे अध्यक्ष सौ. शोभाताई गावंडे, तसेच प्रमुख अतिथी सौ.वंदनाताई गावंडे, सौ.सीमाताई गायकवाड तसेच प्रमुख मार्गदर्शक समन्वयक प्रा. सौ. एस. एस.जाजू हे मंचकावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . कार्यशाळेचे प्रास्ताविक व उद्देश प्रा. जाजू यांनी स्पष्ट केले.यात बी.ए. भाग 2 च्या विद्यार्थिनींनी चैताली महल्ले , अश्विनी फड, प्रणाली भोयर यांनी पोहा आलू कटलेट, आलू कटलेट, स्वाती इंगोले , वैशाली राठोड यांनी बिस्कीट चा केक, भावना खंडारे, पल्लवी भगत यांनी गव्हाच्या पिठाच्या मठरी, भूमिका आवारे ,स्वाती वानखडे यांनी पोटॅटो रोल समोसा, तसेच बी.ए. भाग 3 चे साक्षी भगत, वैष्णवी राऊत, मोहिनी इंगळे यांनी फ्रँकी आणि कटलेट, सोनम शृंगारे, ललिता निंबेकर, प्रज्ञा चुंबले यांनी फ्रेंच फ्राईज आणि आणि चीज बॉल, प्रिया राऊत, सुप्रिया भगत आणि अंजली बोंबले यांनी ब्रेड रोल, तर राणी जामनिके ,मोहिनी मनवर ,वैष्णवी भगत यांनी मोमोज आणि क्रिस्पी नाश्ता असे विविध पौष्टिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थ प्रात्यक्षिकेद्वारे सर्वांना करून दाखविले.
कार्यशाळेचे संचालन प्रिया राऊत आणि ललिता निंबेकर यांनी तर आभार प्रदर्शन भावना खंडारे यांनी मानले. कार्यशाळे करिता गावातील सर्व मंडळीचे सहकार्य लाभले व कार्यशाळा यशस्वी संपन्न झाली.
ही कार्यशाळा संस्थेचे सचिव श्री चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन प्राचार्य डॉ.कान्हेरकर सर यांच्या मार्गदर्शनात प्रा.सौ. एस. एस. जाजु यांनी आयोजित केली व यशस्वी संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये जवळपास 45 गावातील नवयुवती व महिलांनी सहभाग घेतला. व महाविद्यालयातील 21 विद्यार्थिनी यांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्व गावकरी मंडळी यांनी या पाककृतीचे आस्वाद घेतले व कार्यशाळा यशस्वी संपन्न झाली.
समन्वयक
गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ
प्राध्यापक सौ. सुषमा जाजु
0 Comments