Ticker

6/recent/ticker-posts

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं, महाराष्ट्रात 53.51 टक्के मतदान

 
सकाळी 7 वाजल्यापासून मतदार आपले कर्तव्य म्हणजे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडण्यास सुरुवात झाली.
देशभरातील 89 मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची वेळ संपेपर्यंत अर्थात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी 64.70 टक्के मतदान झालं. तर यापैकी महाराष्ट्रात आठ मतदारसंघात 53.51 टक्के मतदान झालं. यामध्ये वर्धा लोकसभा मतदार संघात सर्वाधिक 56.66 टक्के मतदान नोंदवण्यात आले, तर हिंगोलीत सर्वात कमी 52.03 टक्के मतदान झाले.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान

  राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.५१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

यवतमाळ-वाशिम - ५४.०४ टक्के

अकोला -५२.४९ टक्के

अमरावती - ५४.५० टक्के

वर्धा - ५६.६६ टक्के

बुलढाणा - ५२.२४ टक्के

हिंगोली - ५२.०३ टक्के

नांदेड - ५२.४७ टक्के

परभणी -५३.७९ टक्के


लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.०१ टक्के मतदान

 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सूरु झालंय. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झालं आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :


यवतमाळ- वाशिम - ४२.५५ टक्के

 अकोला -४२.६९ टक्के

अमरावती - ४३.७६ टक्के

बुलढाणा - ४१.६६ टक्के

हिंगोली - ४०.५० टक्के

नांदेड - ४२.४२ टक्के

परभणी -४४.४९ टक्के

वर्धा- ४५.९५ टक्के

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सूरु झाले हेते. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणं

यवतमाळ - वाशिम -३१.४७ टक्के

अकोला -३२.२५ टक्के

अमरावती - ३१.४०टक्के

वर्धा - ३२.३२ टक्के

हिंगोली - ३०.४६ टक्के 

नांदेड - ३२.९३ टक्के

परभणी -३३.८८ टक्के

बुलढाणा - २९.०७ टक्के



राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज आज सकाळी 7.00 वाजतापासून सूरु झालं आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सकाळी 11.00 वाजतापर्यंत सरासरी 18.83 टक्के मतदान झालं.

मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणं :

वर्धायवतमाळ - वाशिम -18.01 टक्के 

वर्धा- 18.35 टक्के

अकोला -17.37 टक्के

अमरावती - 17.73 टक्के

बुलढाणा - 17.92 टक्के

हिंगोली - 18.19 टक्के

नांदेड - 20.85 टक्के

परभणी -21.77 टक्के

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज एप्रिल 2024 रोजी सकाळी 7.00 वाजतापासून सूरु झालं आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सकाळी 9.00 वाजतापर्यंत सरासरी 7.45 टक्के मतदान झालं आहे.

मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणं :

यवतमाळ - वाशिम - 7.23 टक्के

वर्धा - 7.18 टक्के

अकोला - 7.17 टक्के

अमरावती - 6.34 टक्के

बुलढाणा - 6.61 टक्के

हिंगोली - 7.23 टक्के

नांदेड - 7.73 टक्के

परभणी - 9.72 टक्के

'या' चर्चेतील मतदारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद : 



Post a Comment

0 Comments