उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडून पक्षाचे चिन्ह चोरल्यामुळे मतदार संघामध्ये प्रचंड रोष व्यक्त केल्या जात असून मतदारांमध्ये उद्धव ठाकरे बद्दल सहानुभूतीची प्रचंड लाट मतदारसंघांमध्ये पाहावयास मिळत आहे त्यामुळे
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांचा विजय निश्चितच असे प्रतिपादन शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विदर्भातील प्रख्यात मूळव्याध तज्ञ डॉक्टर सुभाष राठोड यांनी प्रचार रॅली दरम्यान माध्यमांशी बोलताना सांगितलं
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या प्रचारार्थ कामरगाव येथे प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रचार रॅलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या नेत्यासह कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता
प्रचार रॅली दरम्यान डॉक्टर सुभाष राठोड पुन्हा म्हणाले की संविधानामध्ये बदल करण्याचे षड्यंत्र बीजेपी करीत आहे तर काही नेत्यांना ईडीचा धाक दाखवत काही नेत्यांना तुरुंगात पाठविण्याचा प्रकार बीजेपी ने केला आहे गोरगरीब जनता व शेतकऱ्यांना मोठमोठे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक सुद्धा या बीजेपीच्या नेत्यांनी केली आहे असेही यावेळी प्रचार रॅली दरम्यान डॉक्टर सुभाष राठोड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले
0 Comments