श्याम अपूर्वा
शेलुबाजार प्रतिनिधी :-
दि.17 रोज बुधवार रोजी
रामनवमी निमित्त राम मंदिर येथून शोभायात्रा ढोल ताशाच्या गजरात व तसेच अनेक गावातून हरिपाठ कीर्तनकार आपले टाळ वाद्य स्वतः आणून अनेक मंडळ या रामनवमी यात्रेमध्ये सहभागी झाले व जय घोष रामाचे गीत गायन करण्यात आले.
स्थानिक शेलुबाजार चे युवा रामभक्त तसेच राम राज्य ढोल वाद्याचे प्रमुख व इतर सदस्य यांच्या ढोल ताशे वाद्य शांततेत आनंदात रामनवमीनिमित्त भव्य संपूर्ण गावात रॅली काढून व तसेच रामरत वर विराजमान होऊन या भव्य स्वरूपाचे कलारत्न देखावा आकर्षक करून येणारे जाणाऱ्यांचे या आयोजक व तसेच या यात्रेमध्ये सहभागी होऊन चौहुकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले व शेलुबाजार नगरी रामनगरी म्हणून दुमदुमली या रामराज्य ढोल ताश वादक यांनी मोठ्या उत्साहात आपले कार्य निगडित घेऊन चांगला उत्साहीं शोभा दाखवली डीजे व इतर महागडे वाद्य बाजूला ठेवून शांततेचे ढोल ताशे वाद्य टाळ मृदंग या माध्यमातून राम यात्रेचे रथ संपूर्ण परिसरात निघत असताना प्रत्येकाने आपापल्या घरासमोर रंग रांगोळी काढून पुष्पांची वर्षाव करण्यात आले.
रामरथ यात्रेचे सन्मान करूनी रामनवमी उत्सव शांततेत सर्वांनी आनंदमय वातावरणामध्ये उत्साह दाखवण्याचा संकल्प शेलुबाजार नगरी येथे शांततेत रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.फटाक्याच्या आतिषबाजीने रॅलीमध्ये उत्साह पाहून मान्यवरांनी आनंद व्यक्त केला.
0 Comments