शेलुबाजार वार्ता :- श्याम अपूर्वा.
येथून जवळ असलेल्या हिरंगी. तपोवन.लाठी.ईचा - नागी या ठिकाणी शेलुबाजार सह व इतर परिसर अनेक ठिकाणी साडेचारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट मोठ्या प्रमाणात गावातील घरावरचे टिन व बाजूच्या लहान मोठ्या खोपड्या उडून गेली आणि पिकाचे मोठे नुकसान होवून निसर्गाने शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात गावातील नुकसान पडझड होऊन हानी झाली आहे.
निसर्ग राजा पण शेतकऱ्यांच्या हिताचे नाही शेतकरी चिंतेत गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले असून त्यांना शासनाकडून पाहणी करून भरपाई देण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी असून त्वरित संबंधितांनी लक्ष घालून या बाबीकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकरी - दिलीप राऊत वनोजा.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आपणास मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून नेहमी आश्वासन देते अशी परिस्थिती शेतकऱ्यावर याला नाही पाहिजे त्वरित संबंधितांनी या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे गजानन प्रल्हाद राऊत ईचा
या अगोदरही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती परंतु शासनाने या बाबीकडे पाठ फिरवली अशी परिस्थिती शेतकऱ्यांना पदरी आली आहे शेतकरी आतोनात नुकसानीच्या खाईत चिंतेत होरपडत आहे.
0 Comments