शेलूबाजार वार्ता :- श्री क्षेत्र महादेव संस्थान ईचा येथे भव्य स्वरूपात शिव पार्वती प्रवेश द्वार कमानीचे लोकवर्गणीतून उभारणी करून आज दि.13 रोज शनिवार रोजी लोकवर्गणीतून कमानी वरील कळस स्थापना मोठ्या हर्ष उल्हासाने समस्त गावकरी मंडळी व तसेच भव्य स्वरूपात रस्त्याच्या दोन्ही कडेला रंग रांगोळी पुष्पमाला वाजत गाजत विविध प्रकारचे गीत गायन करून भजनी मंडळ द्वारे कीर्तन नृत्य सादर करून कळशाची पूजा अर्चना विधीवत पूजा अर्चना करून प्रसाद वितरण करण्यात आले.
उपस्थितीमध्ये ईचा - नागी शेलुबाजार व अन्य परिसरातून मोठ्या संख्येने भाविक कळस स्थापना निमित्ताने अनेक भाविक जमले तसेच आज दि.13 रोज पासून तीर्थक्षेत्र स्थळ असलेले महादेव संस्थान ईचा येथे सात दिवसीय श्रीमद् भागवत सप्ताह सुरू झाले असून परिसरातून मोठ्या संख्येने भाविकांनी या भागवत सप्ताहाचा लाभ घ्यावा अशी विनवणी समस्त गावकरी मंडळाकडून करण्यात आली आहे.
भव्य स्वरूपात कळस स्थापना निमित्ताने गावातील मोठ्या संख्येने भाविक तसेच महिला वर्ग मोठ्या हर्ष आनंदात सर्वात प्रथम कळसाची विधिवत पूजा करून सर्वांनी पूजा दरम्यान प्रार्थना केली सर्वच परिसरात रोगराई मुक्त होवुंन पुढील येणारे वर्षाकरिता शेतकऱ्यांच्या समस्या कमीत कमी व्हाव्यात व चांगले वर्ष पीक पाणी सदनराव व सुख समृद्धी सर्वांच्या पदरी प्रकट व्हावे
अशी प्रार्थना समस्त बंधू भगिनींनी यांनी प्रार्थना केली व कळस स्थापना दिवस लोकवर्गणीच्या माध्यमातून ईचा या गावाचे स्वरूप भव्य दिव्य स्वरूपाची कमांनच्या माध्यमातून चौकडे हिरवगार वेलाई रस्त्याच्या बाजूला लाइटिंग भाविकांकिता बसण्याकरिता सिमेंट काँग्रेडचे बाकडे अशी इत्यादी या गावातून भाविकांनी चांगली व्यवस्था करण्यात आली.
गावा बद्दल मोठ्या हर्ष आनंद गावाचे कार्य चालत असतात येणारे जाणारे भाविक मंगरूळपीर ते शेलुबाजार या रोडवरील रस्त्याच्या बाजूलाच शिवपार्वती कमानीचे प्रवेशद्वारची भव्य निर्मिती झाली असून येणारे जाणारे भाविकांचे मन वेदत आहे. कार्यक्रमध्ये गावकरी मंडळी तसेच इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थिती दर्शविल्याबद्दल मनस्वी गावकरी मंडळी यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रम संपन्न झाले असे जाहीर केले.
0 Comments