शेलुबाजार वार्ता :- श्याम अपूर्वा
कास्तकारानी शेंद्रिय शेती करणे दिवसेंदिवस अत्यंत गरजेचे असून शेतकरी सध्या जास्तीत जास्त रासायनिक शेती कडे ओढले आहे त्यामुळे शेती करणे परवडत नाही. खर्च जास्त उत्पादन कमी होतं आहे . तसेच शेत मालाला योग्य भाव मिळत नाही शेती दिवसेंदिवस कडक होतं आहे.
आधी शेतकरी सकाळी शेतात बैलानी शेती कराचे
तेव्हा शेती नरम होती कारण सर्वाच पासी गायी म्हशी बैल होते. शेतात शेणखताचा भरपूर प्रमाणात वापर होत होता आता ट्रॅक्टर आले बैलं दिसेनासे झाले. पुर्वी प्रत्येक शेतकयींकडे बैलं होते त्येवा त्यांची शेती नफ्यात होती. आता शेती दिवसेंदिवस तोट्यात होतं आहे. एका एकरा मध्ये खर्च जवळपास ३२०० रुपये खर्च नांगरणी ते पेरणी प्रर्यंत एवढा
ट्रॅक्टरला खर्च येतो. खतांचे एक पोत १५००, बियाण्याची किंमत ३२००, ऐकुन खर्च ७९०० रुपये येतो त्यामुळे कास्तकारांणी शेंद्रिय शेती करावी असे आवाहन शेतकरी पुत्र व छत्रपती फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष गणेश नारायणराव बोथे यांनी केले आहे. पुर्वी एवढ्या फवारण्या करावे लागत नव्हत्या आता किटकनाशक औषध वापरामुळे शेती दुषित झाली अन् जनतेत रोगराई आली. ट्रैक्टर द्वारे नांगरणी केली तरच जमीन नांगरटी करता येऊ लागली. पूर्वी रान गाई म्हशी आणि ज्वारीची भाकरी अंबाडी ची भाजी होती. आता दिवसेंदिवस ते पण दिसे ना सी झाली आहे कारण असे कि तण नाषक औषध मुळे रानभाजी कमी झाली. त्यामुळेच दिवसेंदिवस आजार वाढतं जात आहे. पुर्वी ताप आला तर लिंबाची अंतर सालं दिली तर ताप कमी होण्यास मदत होत होती आता रासायनिक खताचा वापर आला. लिंबाची अंतर सालीचा उपयोग होत नाही कारण असे आहे की शेती पुर्ण पणे रसायनिक झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेद्रिय शेती करणे गरजेचे झाले आहे असे मत गोगरी येथील शेतकरी पुत्र व छत्रपती फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष गणेश नारायणराव बोथे यांनी केले आहे.
0 Comments