Ticker

6/recent/ticker-posts

महावितरणच्या गलथान कारभारा मुळे डोकेदुखी अभ्यास पूर्ण होत नाही लाईन आभावी - ग्रामस्थ


शेलुबाजार वार्ता :⁠- येथून जवळच असलेले 
चोरद दि.08 एप्रिल 2024.                                   गटग्रामपंचायत अंतर्गत विजतारा छतालगत लोंबकत असताना विजखांबही झुकले आहेत यामुळे वादळी वाऱ्यामुळे या तारा खांब कोसळल्यास अपघात घडून ग्रामस्थांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
तथापि, महावितरणचे या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे. मंगरूनाथ तालुक्यातील चोरद  गटग्रामपंचायत अंतर्गत जनुना खुर्द या गावांचा समावेश आहे. या दोनी गावांत मिळून एक ते दिड हजार लोक वास्तव्य करीत आहेत. या दोंन्हि गावातील ग्रामस्थांना महावितरणच्या दुर्लक्षामुळे जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. 
अनेक ठिकाणी विजेच्या तारा खाली लोंबकळत आहेत, तर काही खांबही झुकले आहेत. वादळी वाºयाने वीज तारा तुटून खाली पडण्याच्या घटना काही वेळा घडल्या आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार नित्याचाच झाला आहे. त्यात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोणताही लाईनमन या गावांत फिरकला नाही. बरेच वेळा खाजगी लाईनमनकडून वीज पुरवठा सुरळीतकरण्याचे काम करून घ्यावे लागते. यासंदर्भात गावकºयांनी शेलुबाजार तसेच मंगरूनाथ या ठिकाणी तोंडी तक्रार केल्या, मात्र गावकºयांच्या  दखल घेऊन अद्यापही कोणताही प्रश्न सोडवला नाही.

 गावात केवळ एकच रोहित्र असून, याच रोहित्रावर कृषीपंपांसह गावकºयांना वीज पुरवठा केला जातो. तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर अनेकदा येथील ग्रामस्थांना अंधारात रात्र काढण्याची वेळही अनुभवावी लागली. या प्रकारामुळे ग्रामस्थांचा जीवच धोक्यात असल्याने गावकºयांत संतापाची लाट उसळली असून, महावितरणच्या अधिकाºयांनी दखल घेऊ न तातडीने समस्या न सोडविल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments