Ticker

6/recent/ticker-posts

वन्यप्राणी भयमुक्त शेती व पिक नुक़सान भरपाई साठी कार्यशाळा संपन्न


वन्यप्रण्याकडून होणारे कृषी उत्पादनाचे,पशूधनाचे  व  मानवी जीवित हानीची नुकसान भरपाईसाठी एक खिडकी योजना कार्यन्वीत करा. तसेच नुकसानीच्याढ मोजमापाचे निकष निश्चित करून अंमलबजावणी प्रक्रीयेतील कागदपत्राचा किचकटपणा कमी करण्यात यावा.बोगस नुकसान भरपाई  घेणाऱ्यांवर व मिळवून देणाऱ्या दलालानवर कारवाई करावी.


वन्यप्राणी भयमुक्त शेती व पिक नुक़सान भरपाई

याच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणीत  व कायद्यातील त्रृटी दूरकरणे हा कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी रविवार दि 21एप्रिल2024 रोजी राज्यातील  कार्यकर्त्याचे प्रशिक्षण शिबिराचे पूणे येथील एस.एम.जोशी फाऊंडेशनचे सभागृहात आयोजन करण्यात आले.या प्रशिक्षण  शिबिरात राज्यातील विस जिल्ह्यातील या विषयावर सक्रीय कार्य करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.

या शिबिरात राज्यभरातून आलेल्या कार्यकत्यानी आपली प्रत्यक्ष कामातील अनुभव व प्रशासनाची  निष्क्रिय प्रवृती मांडली.
या प्रंसगीभारतीय जनसंसद व शेतकरी संरक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव बदखल यांनी पंरपरागत असलेल्या ज्ञानाचा उपयोग करून त्या मध्ये संशोधन होणे गरजेचे आहे आहे असे मत मांडले.
अध्यक्ष पदा वरून बोलतांना डाॅ. मिलींद वाटवे म्हणाले राज्याच्या वैविध्यपूर्ण अशा भौगोलीक, सामाजिक,सांस्कृतिक अंगाने वन्य प्रण्याच्या संदर्भात असलेल्या अनुभवाच्या पंरपरागत धारणा याचा सखोल अभ्यास केल्याने वन्यप्रणी व मानव यांचा संघर्ष कमी होऊन जैवविविधता, पर्यावरणाचे संवर्धन होईल असा विश्वास व्यक्त केला. 
या शिबिरात वन्यप्रण्याचे स्वभाव,सवयी, आदिवासी,भटके पशुपालक यांची
 जिवनशैली, जंगलातील,दुर्गम  भागातील जनजीवन,
इ.मुद्द्यावर प्रत्यक्ष वनात कार्यरत असलेले अभ्यासकांनी आपली निरिक्षणे मांडली.
या शिबिरात भारतीय जनसंसदेचे चंद्रपूर महिला जिल्हा अध्यक्ष सौ.ज्योती लांडगे यांनी येथिल वन्य प्रण्याच्या कडून होणारे नुकसान व त्याची भरपाई करून मिळण्याबाबत लाभार्थीपर्यंत योजना पोहचवण्याचे काम करीत असतांना येणर्रर आडचणी मांडल्या.या शिबिरात अमोल जाधव सांगली,कौस्तुभ पांढरीपोटे,राजू केंढे परभणी,पोपटराव खोसे अध्यक्ष अरण्यमित्र संम्मेलन व नदी पात्रातील वाळू संरक्षक,अहमदनगर,गोपाळ दुधाने वर्धा ,चक्रधर नरवडे हिंगोली,आशा कर्रवार यवतमाळ,गुरूदास नुलकर शाश्वत विकासाचे अभ्यासक पुणे,सुनिल करकरे निसर्ग व वन्यजीव फोटोग्राफर,अभ्यासा कोल्हापूर,पल्लवी सुधागड,प्रकाश मोरूस्कर सिंधुदुर्ग, भोईटे चंद्रपूर,ॲड.विद्या महाजन पुणे,दुर्गादास गडचिरोली,रामचंद्र दोडके नागपूर,वैदेही दांडेकर,योगेश फाटक,अजिंक्य, निलम कार्ले,बाबुसिंग जाधव यवतमाळ याच्यसह अनेक कार्यकर्त्यानी विचार मांडलेत.

Post a Comment

0 Comments