मंगरूळपीर ,दि.०१मे
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त आज १ मे रोजी मंगरूळपीर तहसील कार्यालय येथे आमदार लखन मलीक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत झाले. यावेळी पोलीस पथकाने व होमगार्ड पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. उपविभागीय अधिकारी राजेश जाधव, तहसीलदार श्रीमती शितल बंडगर, नायब तहसीलदार उपविभागीय कार्यालय मंगरूळपीर, आर.झेड .ढोबळे , महसूल नायब तहसीलदार एन.एस. सातगे , निवासी नायब तहसीलदार राठोड, निवडणूक नायब तहसीलदार राजेश बोंडे साहेब
माजी नगराध्यक्ष वीरेंद्रसिंह ठाकूर, न.प. आरोग्य निरीक्षक राजेश संगत, संपादक वसंतराव इंगोले, वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक
व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन झेडपी महाविद्यालयाचे प्राध्यापक दीपक राऊत यांनी केले .
0 Comments