महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 15 जुलैपासून महसूल कर्मचार्यान्चे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. वास्तविकता महसूल विभाग हा प्रशासनाचा कना असून सुद्धा महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या बऱ्याच काळापासून प्रलंबित आहेत. मात्र सदर मागण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामध्ये आकृतीबंध व इतर अनुषंगिक महत्त्वाच्या मागण्या आहेत. सदर आंदोलनामुळे नागरिकांची कामे निश्चितच प्रलंबित आहेत परंतु त्याचप्रमाणे प्रशासनाचा कणा असणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन स्तरावरून मंजूर होणे हेदेखील तेवढेच आवश्यक आहे. महसूल कर्मचार्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत महसूल कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.(श्री रवि महाले, जिल्हाध्यक्ष महसूल कर्मचारी सन्घतना वाशिम)
0 Comments