मानोरा/कारंजा : विधानसभा
निवडणुकीला साडेतीन ते चार महिन्यांचा कालावधी असला तरी आतापासूनच कारंजा विधानसभा मतदारसंघ बाहेरील व स्थानिक उमेदवारीच्या मुद्यावरून चर्चेत आला आहे. यापूर्वी मानोऱ्यात बैठक घेऊन स्थानिक उमेदवारीचा मुद्दा उचलून धरल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी थेट मुंबईत खासदार शरद पवार यांची भेट घेऊन याच मुद्याचा पुनरुच्चार केला. कारंजा विधानसभा मतदारसंघात मानोरा व कारंजा या दोन तालुक्याचा समावेश असून, लोकसभा निवडणुकीत महाआघाडीच्या उमेदवाराला कारंजा विधानसभेतून मताधिक्य मिळाले होते.
हाच धागा पकडून महाविकास
आघाडीकडून विधानसभेसाठी
इच्छुकांची मोठी यादी होत आहे.
त्यातच मतदारसंघाबाहेरील इच्छुकांनीदेखील कारंजा व मानोरा तालुक्यात गाठीभेटींचा धडाका लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी कारंजा विधानसभेतून स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देण्याचा मुद्दा रेटून धरला आहे.
स्थानिक नेत्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.५) मुंबईत खासदार शरद
यांची भेट घेऊन व राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्याशीही स्थानिक उमेदवारीच्या मुद्याच्या अनुषंगाने कारंजा व मानोरा तालुक्यातील स्थानिक महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ लवकरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेणार . त्यामुळे बाहेरील व स्थानिक इच्छूकांच्या उमेदवारीचा मुद्दा चांगलाच पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
स्थानिक इच्छुक उमेदवारांनाच उमेदवारी द्यावी, अशी एकमुखी मागणी केली. शिष्टमंडळात शरद पवार गटाचे प्रदेश संघटक सचिव अरविंद पाटील इंगोले, प्रदेश सरचिटणीस डॉ. श्याम जाधव (नाईक), जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकीरड, माजी जि. प. अध्यक्षा ज्योती गणेशपुरे, सुनील जामदार, उद्धवसेनेचे अनिल राठोड, तालुकाप्रमुख स्वींद्र पवार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बलदेव महाराज,बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे, दिलीप रोकडे पाटील, शेतकरी नेते डॉ. विठ्ठल घाडगे आदींचा समावेश होता. मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीने सर्वानुमते हा निर्णय घेऊन एकजुटीने कामाला लागले असल्याचे चित्रही मतदारसंघात दिसून येत आहे. या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर कारंजा मानोरा मतदारसंघातून अनेक वेळा संकटाचा सामना करत विरोधकांना न घाबरता मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचे कार्य कोरोना काळात सुद्धा यांनी केले जनसामान्यांच्या हाकेला धावून जाणाऱ्या माजी जि. प. अध्यक्षा ज्योती गणेशपुरे, यांच्या कार्याची दखल घेऊन पवार साहेब उद्धव साहेब यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही . असे जनसामान्यात बोलले जात आहे. महाविकास
आघाडीकडून विधानसभेसाठी
इच्छुकांची मोठी यादी होत असली तरी. मतदारसंघातील नागरिकांच्या भावनेचा विचार करावा असा कौल मतदार संघातून दिसून येत आहे.
0 Comments