Ticker

6/recent/ticker-posts

विधानसभा निवडणुकीचा निकाल;


वाशिम जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. साधारण दोन तासांत ६ लाखांवर मतदारांचा कल बाहेर येण्याची शक्यता आहे. दुपारी २ पर्यंत सर्व मतदारसंघांतील चित्र स्पष्ट होईल. तोवर सर्वांची उत्सुकता ताणली जाणार आहे त्यामुळे आज मतमोजणीनंतर कोण गुलाल उधळणार आणि आपला नव्या आमदार कोण? यावर शिक्कामोर्तब होणार

     वाशिम कोरोनेशन क्लब हॉल

    कारंजा बाजार समिती परिसर

        रिसोड तहसील कार्यालय.  
     या ठिकाणी मतमोजणी होणार

विधानसभा निवड‌णुकीसाठी २० नोव्हेंबरला वाशिम मतदारसंघातील ३८९, रिसोडातील ३५० आणि कारंजा मतदारसंघातील ३६१ अशा एकंदरित ११०० केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. एकंदरित १० लाख १ हजार १०७ मतदारांपैकी ६ लाख ७६ हजार ९६८ मतदारांनी (६७.९ टक्के) उत्स्फुर्तपणी मतदानाचा हक्क बजावला. त्यात रिसोड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७०.३६ टक्के मतदान झाले. 
वाशिम मतदारसंघात ६५.६३ टक्के, तर कारंजात मतदानाची टक्केवारी ६५.४३ इतकी राहिली.

 २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात स्थापन करण्यात आलेल्या केंद्रांमधून मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली आणार आहे. त्यात कोणत्या मतदारसंघातून कोणत्या राजकीय पक्षाचा किंवा अपक्ष उमेदवार बाजी मारणार आणि कुणाला पराभव पत्करावा लागणार, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. मतमोजणी केंद्र परिसरात नागरिकांची निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.



वाशिम :

• वाशिम विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रथगकिरित राखीव असून, या मतकरसंघात 
बौद्ध, मुस्लिम आणि मराठा
 समाजातील मतदार निर्मायक भूमिकेमुळे भाजीपालाटणार.

रिसोड :

• या मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या तुलनेने अधिक आहे: परंतु मुस्लिम, इंजारी, बौद्ध समाजाची मते देखील निर्णायक ठरतात.

कारंजा :

• या विधानसभा मतदारसंघात मराठा, मुस्लिम, बंजारा या तीन समाजाची मते निविदा भूमिका बजावतात.

जिल्ह्यातील तिन्ही
विधानसभा महासंघात २० नोव्हेंबर रोजी निवद्वणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज २३ नोव्हेंबरला त्याचा निकाल जाहीर केला जाणार असूर प्रशासनाकडून जथ्यत तयारी करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांवर चौख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments