Ticker

6/recent/ticker-posts

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.



भाजपा ठरणार सर्वांत मोठा पक्ष?


पॉलिटिकल ब्युरे अँड अॅनालिसिस ब्युरो या संस्थेने मतदानानंतर लोकांच्या मनात नेमकं काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थेने राज्यात कोणाला किती जागा मिळणार? याचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार राज्यात भाजपाला 99 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना पक्षाला 33 जागा मिळू शकतात. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 19 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच महायुतीला एकूण 151 जागा मिळण्याची शक्यता आहे. 


शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?


दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस या पक्षाला 36 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला 38 जागा मिळू शकतात. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 47 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच महाविकास आघाडीला एकूण 121 जागा मिळण्याची शक्यता आहे. 


यावेळी अपक्ष उमेदवारांचीही भूमिका महत्त्वाची 


प्राब या संस्थेच्या अंदाजानुसार या निवडणुकीत एकूण सहा अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतात. समाजवादी पार्टीचाही दोन जागांवर विजय होण्याची शक्यता आहे. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचा दोन तर एमआयएम पक्षाचा एका जागेवर विजय होऊ शकतो. जनसुराज्य, भाकप, मनसे, रासप, सेकाप या पक्षांनाही प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, वर नमूद केलेला एक्झिट पोलचा निकाल हा फक्त अंदाज आहे. 23 तारखेला मतमोजणीनंतर राज्यात कोण सरकार स्थापन करणार हे समजणार आहे. त्यापूर्वी मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. बैठकांचे सत्र चालू झाले आहे. सरकार स्थापन करण्यासाठी प्लॅन बी तयार करण्यात येत आहे. त्यामुळे 23 तारखेला काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Post a Comment

0 Comments