वाशिम : कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, कुठेही अनुचित प्रकार घडू नये, याकडे पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले. यादरम्यान विविध स्वरूपातील ३९९ केसेस करून पोलिसांनी सुमारे ३० लाखांचा ऐवजी जप्त केला, तसेच १० पेक्षा अधिक गुन्हेगारांना तडीपारदेखील करण्यात आल्याची
माहिती प्राप्त झाली. विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्हा पोलिस दलाकडून सातत्याने प्रभावी कायदेशीर कारवाया करण्यात आल्या. त्यात ऑपरेशन ऑल आउट, कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी यासारख्या विशेष मोहिमांचा समावेश होता.
या अंतर्गत निगराणी बदमाश, रेकॉर्डवरील गुन्हेगार, वॉरंटवरील आरोपी तसेच नाकाबंदी करून संशयित वाहनांची कडेकोट तपासणी करण्यात आली निवडणूक कालावधीत पोलिसांनी अवैध शस्त्र व दारूगोळाप्रकरणी १० केसेस दाखल केल्या. यासह अवैध देशी, विदेशी, हातभट्टी दारूप्रकरणी ३१९ केसेस करत २९ लाख २४ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
एखाद्या व्यक्तीविरोधात हाणामारी करणे, धमकी देणे, खंडणी वसूल करणे, दंगल माजविण्याचा प्रयत्न करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे, अशा व्यक्तींवर तडीपारची कारवाई केली जाते.
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत १० सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत धडक कारवाई करण्यात आली. यामुळे गुन्हेगारीविषयक घटनांवर नियंत्रण मिळाल्याचे आशदायक चित्र निर्माण झाले आहे.
• महाराष्ट्र पोलिस कायदा (पूर्वीचा मुंबई पोलिस कायदा) ५५, ५६, ५७ अन्वये विविध स्वरूपातील गुन्ह्यांची नोंद असलेल्या गुन्हेगारावर तडीपार किंवा स्थानबद्धतेची कारवाई केली जाते.
वाशिम जिल्हा पोलिसांनी सर्व तन्हेच्या गुन्हेगारांचा समाचार घेत केल्या कारवाया !
• नियमाचा भंग करून काहीजण बेकायदेशीर देशी-विदेशी आणि गावठी हातभट्टीची दारू विकतात.
• धमकी देऊन पैसे लुटतात. काही वन्यजियांची तस्करी करतात. अशा सर्व गुन्हेगारांचा पोलिसांकडून समाचार घेतला जात आहे.
कुठेही कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला
0 Comments