वनोजा: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्र आणि श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय, वनोजा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29/11/2024ला संविधान जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला प्रमुख उद्घाटक म्हणून डॉ संजीव ईंगळे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मंगरूळपीर ,तर प्रमुख वक्ते म्हणून अकोला येथील प्रसिध्द विचारवंत आणि संविधान अभ्यासक , डॉ. एम.आर.इंगळे लाभले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने आणि संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली. मान्यवरांच्या स्वागतानंतर पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक प्रा बापूराव डोंगरे यांनी केले.त्यांनी प्रास्ताविकातून या कार्यशाळेच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. यानंतर उद्घाटनीय भाषणामध्ये डॉ.संजीव इंगळे यांनी संविधान जनजागृती कार्यशाळेची आवश्यकता सांगितली.संविधान हे आपल्या हक्काची सनद आहे,त्याचे जतन करणे ही काळाची गरज आहे.असे ते म्हणाले. यानंतर संविधान अभ्यासक डॉ. एम.आर. इंगळे यांनी आपल्या व्याख्यातून '26 नोंव्हेबर'या दिवसाचे महत्व उपस्थितांना सांगितले.1909,1919,1935 या तीनही सुधारणात्मक कायद्याचे विकसित संविधानामध्ये आलेले आहे. संविधान निर्मितीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका महत्वपूर्ण होती;असे ते म्हणाले. संविधान सभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाजलेल्या विविध भाषणांचा संदर्भ यावेळी डॉ. ईंगळे यांनी दिला . आपल्या अध्यक्षिय भाषणातून मराठी विभाग प्रमुख डॉ गजानन घोंगटे यांनी मतदानाच्या हक्काविषयी विद्यार्थ्यानी जागरूक असायला पाहिजे .संविधानाने दिलेला हा अबाधित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असे ते म्हणाले.
या कार्यशाळेला महाविद्यालयातील प्रा डॉ. ममता पाथ्रीकर, डॉ .जयाप्रभा भगत,प्रा.दीपक भगत,डॉ. सुनील बोरचाटे,प्रा.संदीप ईंगळे,प्रा.संजय पोतराजवार, प्रा. वैभव राऊत प्रा.तृषाल राऊत,तसेच शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ देवेंद्र गाव़ंडे यांच्या मार्गदर्शनात पार पडला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ सचिन कडू यांनी तर आभार प्रा.राधिका सावके यांनी मानले.
0 Comments