"लाडक्या माईंचा धडाकेबाज जनता दरबार – विकासासाठी थेट जनतेशी संवाद!"
कारंजा : कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघातील जनतेच्या मनात घर करून बसलेल्या आणि आपल्या मनमिळाऊ, मायाळू स्वभावामुळे "लाडक्या माई" म्हणून ओळख मिळवलेल्या आमदार सौ. सईताई डहाके आता थेट जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहेत.
पहिल्यांदाच आमदारपदी निवडून आलेल्या सईताई डहाके यांनी माजी आमदार स्व. प्रकाशदादा डहाके यांचे सामाजिक कार्य, जनतेशी असलेली बांधिलकी आणि विकासदृष्टी यांचा वारसा पुढे चालवत, मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद साधण्याचे ठरवले आहे.
त्या अनुषंगाने २१ मे २०२५, सकाळी १०:०० वाजता, शेतकरी निवास, मंगरूळपिर रोड, बायपास कारंजा येथे एक विशेष "जनता दरबार" आयोजित करण्यात आला आहे.
या जनता दरबारात तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, विद्युत अभियंते, शिक्षणाधिकारी, बँक व्यवस्थापक यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे.
गोरगरीब, वयोवृद्ध, दिव्यांग आणि महिला नागरिकांच्या समस्या हळव्या मनाने समजून घेणाऱ्या माई सर्वसामान्यांसाठी कायमच उपलब्ध असतात. त्यामुळे सोमवार व मंगळवार पर्यंत नागरिकांनी आपले अर्ज लेखी स्वरूपात कृषी उत्पन्न बाजार समिती आठवडी बाजार कारंजा येथील जनसंपर्क कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
“सामान्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठीच राजकारणात पाऊल ठेवलं” असं सांगणाऱ्या आमदार सईताई डहाके यांच्या या उपक्रमामुळे कारंजा मानोरा मतदारसंघाच्या विकासाला गती मिळणार असून जनतेच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित तक्रारींचे निराकरण होणार, असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments