Ticker

6/recent/ticker-posts

बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांचे खरे उद्धारक.अश्विनीताई औताडे

मंगरूळपीर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोक आंदोलन न्यास चसमा कार्यकर्त्या अश्विनीताई राम अवताडे यांनी अभिवादन केले असून
डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकताना असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. परंतु स्वतंत्र भारतातील संपूर्ण स्त्रियांच्या प्रगती मागे एका महान महापुरुषाचा हात आहे ते म्हणजे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर,समाजातील प्रत्येक जातीतील गरीब, सामान्य जनतेचे बाबासाहेब नेते होते. त्यांचा विरोध हा विषमतेला अन्यायाला  होता कोणत्याही एका जाती-धर्माला नव्हता. म्हणूनच बाबासाहेब सर्व जाती धर्मातील विषमता नष्ट करून  समानता प्रस्थापित करणारे महान नेते होते. ही विषमता नष्ट करण्यासाठी कृती करावी लागते ते म्हणजे सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य अनिष्टरूढी, परंपरा व त्यातून येणारे घटक बाबासाहेबांनी बारकाईने अभ्यासले
अनेक समाजसुधारकांनी स्त्री उन्नतीचे कार्य केले तेच बाबासाहेबांनी समोर भक्कमपणे चालवले, दूरदृष्टीने ते फक्त चालवलेच नाही तर त्याला घटनेचे कायद्याचे कवच ही दिले. जेणे करून समोर येणाऱ्या  संपूर्ण पिढीतील स्त्रियांना त्याचा लाभ भेटेल. आज स्वतंत्र भारतात कित्येक अधिकार महिलांना बाबासाहेबां मुळे मिळाले. या अधिकारा मुळे महिलांना समाजात हक्क, दर्जा, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त झाली. समाजात स्त्री-पुरुष हे दोन्ही महत्वाचे घटक  आहे. या मधील एक घटक विषम असेल तर समाज कसा प्रगती करू शकेल हे त्यांनी जाणले होते. फक्त स्त्री स्वातंत्र्य स्त्रीमुक्ती यावर बोलून काही होत नाही  त्यासाठी ठोस कृती करावी लागते ते  बाबासाहेबांनी केले. यासाठी इतिहासाचा त्यांनी अभ्यास केला व स्त्रीचे स्थान काय आहे ते बघितले. आज आपण राजकारण, खेळ, नोकऱ्या, कलाक्षेत्र  चित्रपट प्रत्येक ठिकाणी आपण स्त्रिया बघतो आहे.  हा अधिकार त्यांना १५,१६, कलमनुसार देण्यात आला आहे. बाबासाहेब नुसते  बोलते सुधारक नव्हते तर करते  सुधारक होते. महिलांच्या सर्व अधिकारा साठी त्यांनी हिंदू कोड बिल आणले. कायद्याचे कवच असल्यावर महिलांना अधिकार मिळतील हा केवढा मोठा दृष्टिकोन या कोड बीला मुळे महिलांना वारसा हक्क, पोटगी, घटस्फोट घेण्याचे स्वातंत्र्य, विवाह अधिनियम, पुनर्विवाह करण्याचा अधिकार असे महत्त्वाचे अधिकार दिले. स्त्रियांना सर्व सामाजिक, आर्थिक,  शैक्षणिक, वैवाहिक स्तरावर विचार करून महिलांना सर्व स्तरावर सक्षम करणे हे जाणले आणि केले. या शिवाय समान कामा साठी समान पगार असलाच पाहिजे, स्त्री व पुरुषांना सारखाच. महिला संरक्षण कायदा, डिलिव्हरी मध्ये सुट्ट्या, पालकत्वाचा अधिकार, मालमत्तेचा अधिकार  स्त्रियांना  मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. नोकरी करणाऱ्या स्त्रियां साठी गर्भावस्थेत सहा महिन्याची भर पगारी रजेची तरतूद केली. असी तरतुद करणारे जगातील भारत हे पहिले राष्ट्र आहे. डॉ. बाबासाहेबांनी देशासाठी व दलितांसाठी जेवढे कार्य केले त्यापेक्षाही जास्त महिलां साठी कार्य केले.  संविधाना मध्ये स्त्रियांना शिक्षणाचा व स्वावलंबी जीवन जगण्या साठी नोकरी करण्याचा अधिकार दिला. एखाद्या देशाने किती प्रगती केली यांचे मोजमाप त्या देशातील महिलांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक राजकीय स्थिती वरून करावे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारसरणी होती. म्हणून स्त्रियांचे खरे उद्धारक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. 
लोक आंदोलन न्यास यांच्या कार्याध्यक्ष कल्पनाताई इनामदार यांच्या नेतृत्वाखाली एक आगळ्यावेगळ्या चळवळीच्या माध्यमातून आमचे राज्य आणि देश भ्रष्टाचाराच्या दलदली मध्ये गळ्यापर्यंत बुडालेला आहे याला मूठ माती देण्यासाठी इत्यादी बाबींचा विचार करा.
असे प्रतिपादन वाशिम जिल्हा लोक आंदोलन यांच्या सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीताई रामऔताडे  जिव्हाळा फाउंडेशन अध्यक्षा समुपदेशक,मंगरूळपीर यांनी केले.

Post a Comment

0 Comments