– मंगरुळपीर |
महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ना. आकाशभाऊ फुंडकर मंगरुळपीर येथे आयोजित कामगार कल्याण मंडळाच्या कार्यक्रमानिमित्त आगमन झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी ५०० महिला लाभार्थ्यांना मोफत साहित्याचे वाटप केले.
कार्यक्रमानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण कॉलेज, आमदार श्यामभाऊ खोडे यांचे निवासस्थान, वासुदेवराव महल्ले यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे कार्यकारिणी सदस्य पुरुषोत्तमजी चितलांगे यांच्या निवासस्थानी भेट दिली. या कौटुंबिक आणि आत्मीय वातावरणातील भेटीत भाऊसाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
या प्रसंगी पुरुषोत्तम चितलांगे व सौ. लता चितलांगे यांनी ना. फुंडकर आणि अनिकेत ऊर्फ केतन पेसोडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व बालाजीची प्रतिमा देऊन सन्मान केला. संपूर्ण भेटीत एक भावनिक आणि आपुलकीचं वातावरण अनुभवायला मिळालं.
या कार्यक्रमाला आमदार श्यामभाऊ खोडे, राजूपाटील राजे, सुरेशभाऊ लुंगे, नरेंद्र गोलेच्छा, एस.डी.ओ. जाधव साहेब, तहसीलदार रविभाऊ राठोड, मिठ्ठभाऊ शर्मा, सुनीलभाऊ मालमाणी, प्रा. विरेंद्रसिंह ठाकूर, डॉ. दिलीप रत्नपारखी, विनोद जाधव, अभिषेक दंडे, रवि ठाकरे पाटील, वसंतराव धाडवे, डॉ. संजय राऊत, विजय पाटील काळे, सचिन कुलकर्णी, वासुदेवराव महल्ले सर, जिग्नेश लोढाया, किशोरभाऊ भुतडा, किशोर पाटील इंगोले, सचिन पवार, जगदीशभाऊ काबरा, मोहन बळी, बाळुभाऊ मुरकुटे, महोदय विश्वकर्मा, नंदुभाऊ भुजाडे तसेच भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चितलांगे इंडेणचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments