Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी





मंगरूळपीर येथे शासकीय कार्यालयांत विविध कार्यक्रम; समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

मंगरूळपीर ( सुधाकर चौधरी ) – अक्षय तृतीया आणि जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मंगरूळपीर येथील शासकीय कार्यालयांत बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पोलीस स्टेशन, एसडीपीओ कार्यालय, तहसील कार्यालय तसेच नगरपरिषद कार्यालय येथे शासकीय परिपत्रकानुसार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे पीएसआय थोरात मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली बसवेश्वर जयंती साजरी झाली. यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली.


एसडीपीओ कार्यालयात डीवायएसपी आर. जे. मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महात्मा बसवेश्वर यांचे समाजसुधारणेतील योगदान, त्यांच्या विचारसरणीचा आजच्या काळातील संदर्भ अशा मुद्द्यांवर ऊहापोह करण्यात आला.

या कार्यक्रमाला विदर्भ वीरशैव लिंगायत समाज संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब हवा, जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश लोखंडे, तालुकाध्यक्ष बबन आप्पा घळे, जिल्हा संघटक संजय स्वामी, धामणकर सर, नरेश आप्पा रुईकर, गणेश आप्पा कुरळे, गजानन घळे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महात्मा बसवेश्वर यांचे लोकशाही मूल्य, सामाजिक समता आणि शिक्षणविषयक विचार हे आजच्या समाजासाठी मार्गदर्शक ठरावेत, असे प्रतिपादन प्रमुख वक्त्यांनी केले.


Post a Comment

0 Comments