मंगरूळपीर |
मंगरूळपीर नगरपरिषद कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६६ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात व सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. याप्रसंगी नगरपरिषदेचे रोखपाल तथा वरिष्ठ लिपिक श्री. दिनेश पूर्णमलजी व्यास यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली, जे शाळा क्रमांक दोनच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. सचिन धर्माळे सर यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री. गणेश खोड़े यांनी व्यक्त केले.
या समारंभास नगरपरिषदेतील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये श्री. शरद इंगोले, अमोल भगत, भालेराव, चक्रधर जाधव, निलेश भोयर, गजानन तिडके, गणेश खोड़े, प्रशांत पांडे, किशोर कांबळे, राजू शिरसागर, सोहेल शेख, आकाश डाखोरे, अर्जुन मेहेरे, बबन खिराडे, माणिक भोंगळे, दर्शन आगे, विजय नागलकर, अरुण काशीकर, मुरलीधर सोती, विलास धोपटे, सुरेश ठक, अनिल चव्हाण, शैलाबाई रघुवंशी, खंडू इंगळे, धनंजय खंडेतोड, अविनाश मिसाळ, गजानन परळीकर, श्याम कारकळ, इरफान खान, विठ्ठल राठोड, गोपाळ ठक, सतीश गायकवाड, अनिल राऊत, रमेश शृंगारे, दीपक भगत, संजय शृंगारे, सुरज संगत, राहुल काले आदी कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी सेवानिवृत्त कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि इतर मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर सर्व उपस्थितांना अल्पोपहार व चहाचे वाटप करण्यात आले
0 Comments