Ticker

6/recent/ticker-posts

१०० दिवस’ उपक्रमात वाशीम जिल्हा परिषदेची आघाडीभारतीय गुणवत्ता परिषदेच्या पथकाकडून मूल्यमापन; सीईओ वाघमारे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक



वाशीम (सुधाकर चौधरी) – राज्य शासनाच्या ‘१०० दिवस’ उपक्रमांतर्गत वाशीम जिल्हा परिषद अमरावती विभागात आघाडीवर ठरली असून, या पार्श्वभूमीवर भारतीय गुणवत्ता परिषदेच्या (QCI) पथकाने जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचे व उपक्रमांचे मूल्यमापन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या अंमलबजावणीचे पथकाने विशेष कौतुक केले.

मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘१०० डेज’ उपक्रमाची घोषणा केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे सीईओ वाघमारे यांनी तातडीने विभाग प्रमुखांची बैठक घेऊन अॅक्शन प्लॅन तयार केला आणि कार्यवाहीला गती दिली. विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे वाशीम जिल्हा परिषद राज्यात आघाडीवर राहिली.

या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी वाशीम जिल्हा परिषदेची राज्यस्तरीय निवडेसाठी शिफारस केली. त्यानुसार क्यूसीआयचे पथक अत्कर्ष अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. २४) वाशीम येथे दाखल झाले. पथकाने सात प्रमुख निकषांवर तपासणी करत उपाययोजनांचा सखोल आढावा घेतला.

सात निकषांवर मूल्यमापन QCI पथकाने प्रशासकीय कार्यक्षमता, नागरिक केंद्रित सेवा, पायाभूत सुविधा व गुणवत्ता, गुणवत्ता मानके व प्रमाणन, योजनांची अंमलबजावणी व नावीन्य, डेटा व अहवाल सादरीकरण तसेच सहभाग व जबाबदारी या सात प्रमुख निकषांवर जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे मूल्यमापन केले.

मूल्यमापनवेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, अतिरिक्त सीईओ सुनील निकम, लेखा व वित्त अधिकारी दिनकर जाधव, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल भोरखडे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक श्रीराम कुलकर्णी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

गुणवत्तेचा राष्ट्रीय मानदंड भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) ही भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेली एक राष्ट्रीय संस्था असून, देशातील उद्योग व सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा घडवणे व आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय मानके उंचावणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट आहे.


Post a Comment

0 Comments