वाशिम (संदीप भाऊ पिंपळकर): छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा स्नेह संवर्धन मंडळाच्या वतीने भव्य मराठा मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, हा कार्यक्रम रविवार, १८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता रिसोड तालुक्यातील नेतन्सा गावात पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री तथा आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी मराठा समाजभूषण डॉ. भुषण मापारी, तर स्वागताध्यक्ष म्हणून ग्रुप ऑफ शिंदे कॉलेज, मेहकरचे अध्यक्ष डॉ. राम शिंदे उपस्थित राहतील.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार भावना गवळी, आमदार किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी आमदार विजयराव जाधव, डॉ. दिपक मोरे (अध्यक्ष, मराठा स्नेह संवर्धन मंडळ अकोला), दिलीपराव नानोटे (अध्यक्ष, मराठा पाटील समाज संघटना), सुरेश देवकर (अध्यक्ष, अदिती अर्बन, बुलडाणा), उद्योगपती देवेंद्र खडसे, भास्करराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस), राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे, माजी जि.प. अध्यक्षा ज्योती गणेशपूरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सविता मोरे, डॉ. दिपक शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जि.प. सभापती राजू पळसकर, माजी सभापती बाळासाहेब खरात, ज्येष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे, लेखक विनोद बोरे, डॉ. संतोष काकडे, डॉ. अजय पाटील, भाऊसाहेब काळे (अध्यक्ष, मराठा समाज सेवा मंडळ), गजानन पाचरणे (माजी सभापती), सहदेवराव शिंदे (कार्याध्यक्ष, विठ्ठल परिवार पंढरपूर), वसंतराव धाडवे, चंद्रकांत अवचार (अध्यक्ष, आस्थायोग फाऊंडेशन, अकोला), तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या सचिव स्वाती गोरे यांचीही उपस्थिती राहणार आहे.
या सामाजिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन रामतीर्थ महादेव संस्थान नेतन्साचे अध्यक्ष डॉ. गजानन बाजड, दिनकरराव बोडखे, तसेच जयभोले मित्रमंडळ, कावड मंडळ, जयभवानी मित्रमंडळ व सर्व नेतन्सा ग्रामस्थांनी केले आहे.
0 Comments