Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम पोलिसांची धडाकेबाज कारवाई – मंगरुळपीरमध्ये दारु तस्करांवर मोठा छापा, १० लाखांचा मुद्देमाल जप्त


वाशिम (दि. 17 मे 2025): वाशिम जिल्हा पोलिसांनी मंगरुळपीर शहरात दारुबंदी कायद्याच्या अंमलबजावणीत मोठी कारवाई करत अवैध देशी व विदेशी दारु वाहतूक करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई केली. सहाय्यक पोलीस अधीक्षक मा. नवदीप अग्रवाल (भा.पो.से.) यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

जप्त मुद्देमाल:
जयस्तंभ चौक, कारंजा येथील आरोपी विशाल श्रीराम शिवहरे (वय 26) व गजानन टेकराव चौकशे यांच्याकडून बोलेरो (MH-40 BQ-5786) वाहनासह देशी व विदेशी दारु (मूल्य ₹2,01,220), मोबाईल व वाहन असा एकूण ₹10,11,220 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दारुचा पुरवठा करणारे:
रोहित लुल्ला, वैभव ऊर्फ काल्या, अनुप, भोला, गोलू, तन्नू दीपक शिवहरे, मंगेश जाधव (रा. पारवा), बाबू ठाकूर (रा. मंगरुळपीर)

दारु खरेदी करणारे:
दारासिंग राठोड (भडशिवणी), गौतम (खडीधामणी), राम (कामरगाव), बाळू वैरागळे (खेर्डा), पिंटू किर्दक (काकडशिवणी), पुंडलीक पवार (भडशिवणी), प्रकाश वानखेडे (बांबर्डा), उमेश (मोखडपिंप्री), अंकुश (आखतवाडा), अतुल शिंदे (खेर्डा), उदयसिंग राठोड (विळेगाव), गुलाबराव तायडे (बांबर्डा), धीरज खराड, संतोष (पोहा), गौतम इंगोले (पारवा, कारंजा), सिद्धार्थ (चांधई, ता. कारंजा)

सर्व आरोपींविरुद्ध मंगरुळपीर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई) सह भारतीय न्यायसंहिता कलम 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक वाशिम श्री. अनुज तारे (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सपोनि अतुल इंगोले, पोहेकॉ रविंद्र कातखेडे, पोकॉ अनंता डौलसे, पोकॉ सुमीत चव्हाण, पोहेकॉ गणेश बाजड, पोकॉ शंकर वाघमारे आदींचा सहभाग होता.

वाशिम पोलीस दलाच्या या धडाकेबाज कारवाईने अवैध दारु तस्करांच्या टोळक्यांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील कारवायांनाही गती मिळण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments