मंगरूळपीर –
नेहमी प्रसन्न चेहरा, सौम्य स्वभाव, आणि मनात कायम आनंदाची कारंजी घेऊन वावरणारे मंगरूळपीर शहरातील प्रसिद्ध व्यापारी अरुण भाऊ भोजने यांचा वाढदिवस आज मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. शहरात कपड्याचे यशस्वी व्यापारी म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अरुण भाऊंनी केवळ व्यवसायातच नव्हे, तर माणुसकीतही नावलौकिक मिळवलेला आहे.
सदैव मदतीस तत्पर राहणारी वृत्ती, हसतमुख चेहरा आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याची आपली खास शैली यामुळे अरुण भाऊ हे सर्व वयोगटांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त परिवार, मित्रपरिवार, ग्राहक, व्यापारी मंडळी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
वाढदिवसाचे औचित्य साधून अनेकांनी सोशल मीडियावरून शुभेच्छांचे संदेश देत अरुण भाऊंवरील आपली आपुलकी व्यक्त केली. माणसांशी ऋणानुबंध जपणारे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे मंगरूळपीर शहराचा खरा गोडवा आहे, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
त्यांच्या पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, भरभराटीचे दिवस आणि समाधान लाभो, हीच सर्वांची सदिच्छा.
– वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी
0 Comments