विदर्भ कुंभार समाज सुधार समितीचा कौतुकाचा हात; शैक्षणिक यशाला मिळाली सन्मानाची थाप
मंगरूळपीर : मंगरूळपीर येथील कु. चंचल प्रशांत पेंढारकर हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत तब्बल ९१.६० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या उज्ज्वल शैक्षणिक कामगिरीची दखल घेत विदर्भ कुंभार समाज सुधार समिती, अमरावती यांच्या वतीने अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात तिचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
चंचलच्या या यशामुळे मंगरूळपीरच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून, तिच्या गुणवत्तेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सातत्य, मेहनत आणि अभ्यासाची जिद्द कायम ठेवली तर यश निश्चित मिळते, याचा आदर्श चंचलने आपल्या कामगिरीतून निर्माण केला आहे.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सुधाकर शेंडोकार होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रवीभाऊ राणा, माजी खासदार नवनीत राणा, तसेच संजयभाऊ घाटे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष; सुभाष केतवार, सरचिटणीस; प्रदीपभाऊ मले, नगरसेवक; पंजाबराव काकडे, सुरेशराव नांदूरकर, श्रीरामजी कोल्हे, संजय साळवेकर, भगवानजी जानकर, वसंतराव जवळेकर, अरुणभाऊ कोंडके यांच्यासह संत गोरोबाकाका समितीचे पदाधिकारी व विदर्भ कुंभार समाज सुधार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गजाननराव तांबट, श्रीमती प्रभाताई भागवत, सुरेंद्र सरोदे, मधुकरराव खांडेकर, सतीशराव गावंडे, सुनील भागवत, अरुण फोनकर आणि रमेश अंबुलकर यांनी विशेष पुढाकार घेतला.
आई-वडिलांची पुण्याई, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि चंचलची जिद्द!
चंचलला मिळालेला हा सन्मान केवळ तिच्या वैयक्तिक यशाचा गौरव नसून, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या आई-वडिलांचे संस्कार, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि तिच्या अथक परिश्रमांचा सन्मान आहे. या गौरवामुळे चंचलच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला निश्चितच नवी ऊर्जा मिळणार आहे.
विदर्भ कुंभार समाज सुधार समितीच्या वतीने चंचलच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. तिच्या या यशातून समाजातील भावी पिढीने प्रेरणा घेऊन शिक्षणाच्या क्षेत्रात नवे शिखर गाठावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
चंचलने मिळविलेल्या ९१.६० टक्के गुणांमुळे तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, ती भविष्यात आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चितच मोठी झेप घेईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
0 Comments