वाशिम, ता. ५ जून – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग कोठाळे यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचे व शुभेच्छांचे पेग घातले जात आहेत.
विधानसभा पातळीवर पक्षबांधणी, संघटनात्मक कामकाज आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी कोठाळे यांच्या खांद्यावर आली आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्यांची कार्यक्षमता, जनसंपर्क आणि संघटन कौशल्य यामुळे त्यांना ही महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.
या निवडीमुळे वाशिम-मंगरुळपीर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य अधिक बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतील सामाजिक, राजकीय आणि युवावर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन,” असे पांडुरंग कोठाळे यांनी निवडीनंतर सांगितले.
0 Comments